मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व प्रमुख स्थळे, तसेच महत्त्वाच्या ठिकाणांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कोणत्याही अफवेला बळी न पडता प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी नागरिकांना केले आहे.रेल्वे स्थानके, गेटवे आॅफ इंडिया आदींसह प्रमुख सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाने मुंब्रा, तसेच औरंगाबाद येथून संशयित अतिरेक्यांना पकडून घातपाताचा कट उधळून लावला आहे. हे सर्वजण इसिस या अतिरेकी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या अटकेमुळे हल्ल्याचा कट उघडकीस आला असला, तरी सुरक्षा व्यवस्थेत कोणताही गाफीलपणा येऊ नये, अशी सूचना राज्यातील सर्व पोलीस घटकप्रमुखांना देण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.>अफवेवर विश्वास ठेवू नकानागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, संशयास्पद वस्तू, व्यक्ती आढळल्यास तातडीने नजीकच्या पोलिसांना कळवावे.- दत्ता पडसलगीकर,पोलीस महासंचालक.
मुंबईसह राज्यात हाय अॅलर्ट; सर्वत्र कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 5:06 AM