असंसर्गजन्य आजारांची डोकेदुखी; आधुनिक जीवनशैलीचा दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 08:20 IST2025-03-15T08:20:32+5:302025-03-15T08:20:39+5:30

तरुणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार, फुफ्फुसविकाराचे रुग्णही वाढले

High blood pressure diabetes obesity heart disease and lung disease have also increased among young people | असंसर्गजन्य आजारांची डोकेदुखी; आधुनिक जीवनशैलीचा दुष्परिणाम

असंसर्गजन्य आजारांची डोकेदुखी; आधुनिक जीवनशैलीचा दुष्परिणाम

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून राज्यात असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना आजाराच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, बदलती आणि आधुनिक जीवनशैली या आजाराला निमंत्रण देत असल्याचे सांगून या आजराला प्रतिबंध करणे शक्य असल्याचे सांगत आहे. 

आहारपद्धती, बदलती जीवनशैली,  व्यायाम न करणे, व्यसनाधीनता, पुरेसा आराम न मिळणे या सर्व गोष्टीचा परिणाम आरोग्यावर होत आहे. सध्या तरुणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार असे आजार मागे लागले आहेत. त्यासोबत स्ट्रोक आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (फुफ्फुसाचे आजार) या आजारांची भर पडल्याची दिसून येत आहे. विशेष म्हणजे कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याची आकडेवारी आणि नोंदही वेगळी ठेवली जात आहे. महाराष्ट्र राज्य आर्थिक पाहणीच्या अहवालानुसार जी असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये गेल्या तीन वर्षांची आकडेवारी दिली असून वर्षागणिक या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण (डिसेंबरपर्यंत)
वर्ष     हृदयरोग    स्ट्रोक    फुफ्फुसाचे आजार 
२०२२-२३    १५,४७९    ६,७१२    १४,०१४
२०२३-२४    २०,००२    ७,११८    १८,१०१
२०२४-२५    २१,३८१    १०,०३९    २१,७८०

या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक जण तणावात काम करत आहेत. जंकफूड, अवेळी जेवण, व्यायाम न करणे, पुरेशी झोप न घेणे या सर्व गोष्टींचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. दैनंदिन जीवनात बदल करा - डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, मेडिसिन विभाग, जेजे
 

Web Title: High blood pressure diabetes obesity heart disease and lung disease have also increased among young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.