Join us

 मेट्रो ४ साठी ३५७ खारफुटीची झाडं तोडण्याची उच्च न्यायालयाची मुभा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 8:30 PM

मेट्रो - ४ ही वडाळा - घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली या मार्गांना जोडणार आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने मेट्रो - ४ प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा आहे, असे आम्हाला वाटते, असे म्हणत न्या. एस. जे. काथावाला व न्या. रियाझ छागला यांनी खारफुटी तोडण्यास परवानगी देताना म्हटले. 

मुंबईमेट्रो -४ चे भक्ती पार्क स्टेशन उभारण्यासाठी उच्च न्यायालयाने ३५७ खारफुटीची झाडं तोडण्याची परवानगी उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिली. मेट्रो - ४ ही वडाळा - घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली या मार्गांना जोडणार आहे.

सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने मेट्रो - ४ प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा आहे, असे आम्हाला वाटते, असे म्हणत न्या. एस. जे. काथावाला व न्या. रियाझ छागला यांनी खारफुटी तोडण्यास परवानगी देताना म्हटले. 

खारफुटी तोडण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याने एमएमआरडीएने  उच्च न्यायालयात अर्ज केला. नुकसान भरपाई म्हणून  ४४४४ खारफुटी लावण्याची हमी एमएमआरडीएने उच्च न्यायालयाला दिली. तसेच सर्व अटी व शर्तींचे पालन करण्यात येईल असेही एमएमआरडीएने न्यायालयाला सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी

 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

 

संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

पोलीस दलाने हुशार अधिकारी गमावला, कोरोनामुळे आझम पटेल यांचं निधन 

टॅग्स :उच्च न्यायालयमेट्रोमुंबई