सुशांत सिंग राजपूतच्या कामाची उच्च न्यायालयानेही केली प्रशंसा ..........sudharit

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:17 AM2021-01-08T04:17:14+5:302021-01-08T04:17:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने ''''एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी'''' ...

The High Court also praised the work of Sushant Singh Rajput .......... sudharit | सुशांत सिंग राजपूतच्या कामाची उच्च न्यायालयानेही केली प्रशंसा ..........sudharit

सुशांत सिंग राजपूतच्या कामाची उच्च न्यायालयानेही केली प्रशंसा ..........sudharit

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने ''''एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी'''' या चित्रपटात केलेल्या अभिनयाची खुद्द उच्च न्यायालयानेही प्रशंसा केली. तो एक चांगला व्यक्ती होता, हे त्याच्या चेहऱ्यावरून कोणीही सांगू शकेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले.

७ सप्टेंबर रोजी रियाने सुशांतच्या बहिणी प्रियांका व मीतू यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांत गुन्हा नोंदविला. तिने केलेल्या तक्रारीनुसार, या दोघींनी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांकडून एनडीपीएस कायद्यांतर्गत बंदी असलेल्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन दिले. गुन्हा रद्द करण्यासाठी या दोघींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील निर्णय न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने गुरुवारी राखून ठेवला.

गुरुवारच्या सुनावणीत प्रियांका व मीतू यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, टेलिमेडिसिन प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डॉक्टर रुग्णांशी ऑनलाईन चर्चा करून औषध देऊ शकतात. कोरोनामुळे सुशांत स्वतः डॉक्टरांना भेटू शकला नाही. तसेच त्याने ते औषध घेतले, याचे काही पुरावे नाहीत.

त्यावर मुंबई पोलिसांच्यावतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. ''''राजपूत आणि त्याची बहीण प्रियांका यांच्यात व्हाॅट्सॲपद्वारे झालेल्या चॅटमधून निदर्शनास आले आहे की, तिने राजपूत आणि डॉक्टर यांच्यात कन्सल्टेशन न होताच औषधांचे प्रिस्क्रिप्शन दिले. ८ जून २०२० रोजी एक अनोळखी व्यक्ती राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेली. टोकन घेतल्यानंतर त्या आरोपीने डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडून प्रिस्क्रिप्शन घेतले. यासंदर्भात पोलिसांकडे पुरावे आहेत,'''' असे कामत यांनी न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली. ड्रग्सचे कॉकटेल आणि औषधे यामुळे सुशांतचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. राजपूत ८ जूनपूर्वी १४ महिने रियाच्या देखरेखीखाली होता. राजपूत त्याची औषधे ड्रग्सबरोबर घेणार नाही, याची काळजी रियाने घेतली. राजपूतने ८ जून २०२० रोजी ड्रग्स बॉक्समध्ये ठेवल्याचे त्याचा आचारी आणि त्याच्याकडे घरकाम करणाऱ्या व्यक्तीने पाहिले होते. जेव्हा १४ जून २०२० रोजी राजपूतचा मृत्यू झाला, तेव्हा ते चारही ड्रग्स बॉक्समध्ये नसल्याचे आढळले. हे खुद्द घरकाम करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले, असा युक्तिवाद मानेशिंदे यांनी केला.

Web Title: The High Court also praised the work of Sushant Singh Rajput .......... sudharit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.