Join us

मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:06 AM

भाजपच्या भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व कायममुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाचा झटकाभाजपच्या भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती ...

भाजपच्या भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व कायम

मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाचा झटका

भाजपच्या भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व पद रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवत पालिकेचा निर्णय सोमवारी रद्द केला.

नामनिर्देशित सदस्यत्व असलेले भालचंद्र शिरसाट यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. त्यांची नियुक्ती कायद्याशी सुसंगत नाही. त्यामुळे त्यांना समितीवर राहण्याचा अधिकार नसल्याचे अध्यक्षांनी जाहीर करावे, अशी विनंती शिवसेनेच्या स्थायी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली होती. त्यावर भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे यांनी आक्षेप घेतला. शिरसाट यांची नियुक्ती पालिका सभागृहाने केली असून कायदेशीर आहे, असे शिंदे यांचे म्हणणे होते. यावरून बराच वेळ वादविवाद झाला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व रद्द केले. अध्यक्षांच्या या निर्णयाला शिरसाट यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुख्य न्या. दीपंकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने या याचिकेवर गेल्या महिन्यात निकाल राखीव ठेवला. त्यावेळी न्यायालयाने शिरसाट यांना अंतिम संरक्षण दिले होते.

.........................