Maratha Reservation : राज्यातील सध्याची परिस्थिती विदारक, मराठा आंदोलनातील हिंसाचारावर हायकोर्टाची नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 01:46 PM2018-08-02T13:46:53+5:302018-08-02T15:14:15+5:30

मुंबई हायकोर्टाने राज्यातील सध्याची परिस्थिती विदारक बनली असल्याचे सांगत मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान होत असलेल्या हिंसाचाराबाबत नाराजी व्यक्त केली

High Court Expressed views against Maratha Reservation protest | Maratha Reservation : राज्यातील सध्याची परिस्थिती विदारक, मराठा आंदोलनातील हिंसाचारावर हायकोर्टाची नाराजी 

Maratha Reservation : राज्यातील सध्याची परिस्थिती विदारक, मराठा आंदोलनातील हिंसाचारावर हायकोर्टाची नाराजी 

Next

 मुंबई - आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यात सुरू केलेल्या तीव्र आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण प्राप्त होत आहे. सार्वजनिक मालमत्तेची, खाजगी वाहनांची जाळपोळ होत आहे. काही ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने राज्यातील सध्याची परिस्थिती विदारक बनली असल्याचे सांगत मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान होत असलेल्या हिंसाचाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.  

दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांच्या तपासाची सुनावणी आज मुंबई हायकोर्टात सुरू होती. त्यादरम्यान, न्यायमूर्तींनी हे मत नोंदवले. राज्यातील सध्याचे चित्र विदारक आहे. दगडफेक, जाळपोळीच्या घटनांमुळे परिस्थिती स्फोटक बनली आहे. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे, राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. ञ

दरम्यान, दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांच्या तपासाचा प्रगती अहवाल स्वीकारण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांचा तपास हा आतापर्यंत निष्काळजीपणे केला गेला आहे. गौरी लंकेश प्रकरणाच्या तपासामधून काहीतरी शिका असा सल्ला देत हायकोर्टाने एसआयटी आणि सीबीआयने पाठवलेला तपासाचा प्रगती अहवाल न उघताच परत पाठवला. 

Web Title: High Court Expressed views against Maratha Reservation protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.