Join us

ओमकार बिल्डर्सच्या संचालक, अध्यक्षांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:07 AM

ओमकार बिल्डर्सच्या संचालक आणि अध्यक्षांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळलाओमकार बिल्डर्सच्या संचालक, अध्यक्षांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळलाएसआरए, ...

ओमकार बिल्डर्सच्या संचालक आणि अध्यक्षांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

ओमकार बिल्डर्सच्या संचालक, अध्यक्षांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

एसआरए, मनी लॉंड्रिंग घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक आणि ओमकार ग्रुपचे बाबूलाल वर्मा आणि कमल गुप्ता यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. ‘ईडी’ने २२ हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी या दोघांना अटक केली आहे.

झोपडपट्टीत पुनर्वसन योजनेच्या नावावर २२ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याने ईडीने आपला तपास सुरू केला. ओमकार समूहाने विविध बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले आहे. येस बँकेकडून ४५० कोटींचे कर्ज घेतले आहे. हे पैसे इतरत्र वळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ४१० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सुराणा ग्रुपच्या औरंगाबाद येथील ओमकार समूहावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीने ओमकार समूहाच्या दहा जागांवर धाड टाकत चौकशी केली होती. या प्रकरणात कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना अटक करण्यात आली.