मुंबई : कंगनाने मुंबई पोलिसांबाबत केलेल्या टिष्ट्वटला शिवसेनेचे खासदार यांनी ज्या प्रकारे प्रतिक्रया दिली, त्यावर उच्च न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त करत राऊत यांना खडसावले. एका खासदाराने अशाप्रकारे बोलणे योग्य आहे का? असा सवाल केला.
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाविषयी बोलत होतो, असे संजय राऊत यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. राऊत यांच्या वकिलांनी सांगितले की, कंगनाला धमकविण्याचा हेतू नव्हता. तिने महाराष्ट्राविषयी अपशब्द वापरल्याने अशी प्रतिक्रया दिली. त्यावर न्यायालयाने राऊत यांनी व्हिडीओ क्लिपमध्ये ‘कानून क्या है?’ असे म्हटले असून त्याचा अर्थ काय? अशी विचारणा केली.
न्यायालयाने म्हटले की, कायदा काय आहे, हे त्यांना माहीत नाही का? ते सामान्य नसून नेते आहेत. खासदाराने अशी प्रतिक्रिया देणे योग्य आहे का? कायद्याचा आदर तुम्ही करत नाही? सामान्यांपुढे हेच उदाहरण ठेवणार का? असे न्यायालयाने विचारले. त्यावर राऊत यांच्या वकिलांनी त्यांचा कायद्याचा अनादर करण्याचा हेतू नसल्याचे सांगितले.पालिका अधिकारी भाग्यवंत लाटे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे म्हणाले, लाटे वैधानिक कर्तव्य पार पाडत होते. अन्य हेतू नव्हता. मात्र, बांधकाम सुरू होते तेव्हा पालिकेचे अधिकारी काय करत होते? कारवाईस ५ व ७ सप्टेंबरची वाट का पहिली? असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पुढील सुनावणी ५ आॅक्टोबरला ठेवली.‘आम्हालाही महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान’आम्ही याचिकाकर्तीने वापरलेल्या शब्दांशी सहमत नाही. आम्हालाही आम्ही महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे, पण म्हणून तिचे घर तोडणार का? प्रतिक्रिया देण्याची ही पद्धत आहे का? तुम्ही (राऊत) दुर्लक्ष करायला हवे होते, असे न्या. एस. जे. काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने म्हटले.