Join us

नायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 5:48 AM

डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल यांनी जामिनाच्या

मुंबई : डॉ. पायल तडवी हिला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडणाऱ्या तिन्ही डॉक्टरांना नायर रुग्णालयातच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता येईल की नाही, हे जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या विभागप्रमुखांना शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल यांनी जामिनाच्या आदेशात सुधारणा करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. या अर्जावरील सुनावणी न्या. साधना जाधव यांच्यापुढे होती. त्यांच्या अर्जावरील सुनावणीत न्या. जाधव यांनी नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या विभागप्रमुखांना शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. या तिघींचा जामीन मंजूर करताना न्यायालयाने या तिघींनाही आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रात पाऊल ठेवण्यास मनाई केली. 

टॅग्स :पायल तडवीडॉक्टरन्यायालय