राणा दाम्पत्याला उच्च न्यायालयाची तंबी; हनुमान चालीसा पठणप्रकरणाची सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 10:37 AM2024-06-28T10:37:15+5:302024-06-28T10:38:09+5:30

कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याने, पोलिसांनी राणा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

High Court summons to Rana couple Hanuman Chalisa Recitation Case Hearing | राणा दाम्पत्याला उच्च न्यायालयाची तंबी; हनुमान चालीसा पठणप्रकरणाची सुनावणी

राणा दाम्पत्याला उच्च न्यायालयाची तंबी; हनुमान चालीसा पठणप्रकरणाची सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  माजी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा सतत सुनावणी स्थगित करण्याची विनंती करत असल्याने उच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांना तंबी दिली. ही अखेरची संधी आहे, आणखी एकदा याचिका सुनावणीस स्थगिती मागितली तर त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा न्यायालयाने दिला. हनुमान चालीसा पठण प्रकरणातून आपल्याला आरोपमुक्त करण्यात यावे, यासाठी राणा दाम्पत्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  सत्र न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त करण्यास नकार दिल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.  

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करू, असे राणा यांनी जाहीर केल्यानंतर पोलिसांनी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना त्यांच्या खार येथील घरातच अडविले. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याने, पोलिसांनी राणा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: High Court summons to Rana couple Hanuman Chalisa Recitation Case Hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.