तक्रारींची दखल न घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने सरकारला घेतले फैलावर

By admin | Published: October 27, 2016 02:04 AM2016-10-27T02:04:47+5:302016-10-27T02:04:47+5:30

गणेशोत्सव व नवरात्रौत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक तक्रारी करूनही राज्य सरकारने त्यावर काहीच कारवाई न केल्याबद्दल उच्च न्यायालयाने

The High Court took the decision to not take into account the complaints | तक्रारींची दखल न घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने सरकारला घेतले फैलावर

तक्रारींची दखल न घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने सरकारला घेतले फैलावर

Next

मुंबई : गणेशोत्सव व नवरात्रौत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक तक्रारी करूनही राज्य सरकारने त्यावर काहीच कारवाई न केल्याबद्दल उच्च न्यायालयाने सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले. बोरिवली व उल्हासनगरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना अवमानाची नोटीसही उच्च न्यायालयाने बजावली.
आत्तापर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशांवर काहीच पालन करण्यात आले नसल्याचे सरकारच्या प्रतिज्ञापत्रावरून सिद्ध होते, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याचे निर्देश देत ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल, याची खात्री करण्यास सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The High Court took the decision to not take into account the complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.