२ ऑगस्टपासून उच्च न्यायालयाचा काही प्रमाणात प्रत्यक्ष कारभार सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:07 AM2021-07-30T04:07:06+5:302021-07-30T04:07:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती सुधारल्याने २ ऑगस्टपासून उच्च न्यायालयाचा काही प्रमाणात प्रत्यक्ष कारभार सुरू होणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती सुधारल्याने २ ऑगस्टपासून उच्च न्यायालयाचा काही प्रमाणात प्रत्यक्ष कारभार सुरू होणार आहे. बुधवारी झालेल्या उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत मुख्य न्या. दीपांकर दत्ता, अन्य न्यायाधीश आणि बार असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. तसेच मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी या बैठकीत न्यायाधीशांना सांगितले की, लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने आणि कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने उच्च न्यायालयाचा प्रत्यक्ष कारभार सुरू होऊ शकतो.
उच्च न्यायालयाचा प्रत्यक्ष कारभार सुरू झाला तरी आवश्यकता असली तरच पक्षकारांना न्यायालयाच्या आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच हायब्रीड पद्धतीने न्यायालयाचा कारभार सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठाचा प्रत्यक्ष करभार आता सुरू होणार आहे.