मुंबईतील पार्किंगसाठी उच्चस्तरीय समिती

By admin | Published: March 23, 2016 04:12 AM2016-03-23T04:12:23+5:302016-03-23T04:12:23+5:30

मुंबईतील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, यातून पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगची कोंडी सोडविण्यासाठी आता राज्य सरकारतर्फे उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आहे

High-level committee for Mumbai's parking | मुंबईतील पार्किंगसाठी उच्चस्तरीय समिती

मुंबईतील पार्किंगसाठी उच्चस्तरीय समिती

Next

मुंबई : मुंबईतील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, यातून पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगची कोंडी सोडविण्यासाठी आता राज्य सरकारतर्फे उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी, महापालिकेच्या मैदानांच्या खाली भूमिगत पार्किंगची सोय केली जाणार आहे. विकास आराखड्यात बदल केले जाणार आहेत. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत ही घोषणा केली.
भाजपाचे योगेश सागर, राज पुरोहित आशिष शेलार, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, असमल शेख आदींनी या संबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्य सरकार व मुंबई पालिकेच्या नवीन पार्किंग धोरणात समरूपता येण्यासाठी राज्य सरकार आपले धोरण पालिकेला पाठवेल. पालिकेंतर्गत ४६ हजार ३६६ वाहनांसाठी पार्किंगचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. ६ वाहनतळ हस्तांतरित केले आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: High-level committee for Mumbai's parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.