मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असून महाआघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ २० फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली. शिवसेना-भाजपा युती होताच महाआघाडीतही मोर्चेबांधणीला वेग आला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा तिढा सुटला असून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित विकास आघाडी, खा. राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना, तसेच शेकाप, माकप या आघाडीतील घटक पक्षांना आठ जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. अॅड. आंबेडकर यांच्या वंचित विकास आघाडीने अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर केले असले तरी, त्यांची समजूत काढली जाईल.
भाजपाविरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे लागेल, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. राज ठाकरे यांच्या मनसेला या महाआघाडीत स्थान नसेल, मात्र राष्टÑवादी काँग्रेस त्यांच्या वाट्यातील एखादी जागा मनसेला सोडण्याची शक्यता आहे.नांदेड येथे होणाऱ्या महाआघाडीच्या पहिल्या संयुक्त प्रचार सभेला अ.भा.काँग्रेसचे सरचिटणीस आणि महाराष्टÑ प्रभारी मल्लीकार्जु खरगे, राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, स्वत: खा. अशोक चव्हाण, छगन भुजबळ, आ.जोगेंद्र कवाडे आदी नेते उपस्थित राहाणार आहेत.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा दौराकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी १ मार्च रोजी महाराष्ट्र दौºयावर येत असून मुंबई आणि धुळे येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली.