महाराष्ट्रात गुरुवारी उच्चांकी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:23+5:302021-04-02T04:07:23+5:30
महाराष्ट्रात गुरुवारी उच्चांकी लसीकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गुरुवारपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ...
महाराष्ट्रात गुरुवारी उच्चांकी लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गुरुवारपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३२९५ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे तीन लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. राज्यात दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले असून एकाच दिवशी ५७ हजार जणांना लसीकरण करून पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला. त्यापाठोपाठ मुंबईत ५० हजार जणांचे लसीकरण झाले. महाराष्ट्राने देशभरात सर्वाधिक सुमारे ६५ लाखांहून नागरिकांना लसीकरण करून पहिल्या क्रमांकात सातत्य राखले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रेसर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, रोज किमान पावणेतीन लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे. दिवसभरात तीन लाखांहून अधिक जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.