Join us

पश्चिम रेल्वेने लावले हाय व्हॅल्युम लो स्पीड पंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:10 AM

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रवाशांना सोईसुविधा देण्यासाठी नेहमीच नवे तंत्रज्ञान वापरत असते. आता पश्चिम रेल्वेने मुंबई विभागातील चर्चगेट आणि ...

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रवाशांना सोईसुविधा देण्यासाठी नेहमीच नवे तंत्रज्ञान वापरत असते. आता पश्चिम रेल्वेने मुंबई विभागातील चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात १३ हाय व्हाल्युम लो स्पीड तंत्रज्ञानाचे मोठे पंखे बसविण्यात आले आहेत. या पंख्यामुळे चांगल्या व्हेंटिलेशनबरोबरच प्रवाशांना चांगली थंडगार हवा मिळत आहे.

पश्चिम रेल्वेने प्रवाशांना सोयीसाठी हाय वॉल्युम लो स्पीड १३ पंखे लावले आहेत. यामध्ये पाच पंख्ये चर्चगेट स्थानक आणि ८ पंखे मुंबई सेंट्रल स्थानक परिसरात लावण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेने आतापर्यंत एकूण ३४ पंखे लावले आहेत. यामध्ये चर्चगेट (५ पंखे), मुंबई सेंट्रल (१० पंखे), वांद्रे टर्मिनस (२ पंखे), अंधेरी (५ पंखे), जोगेश्वरी (४ पंखे), गोरेगाव (३ पंखे) आणि बोरीवली (५ पंखे) चा समावेश आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी २० पंखे लावण्याचा पश्चिम रेल्वेचा मानस आहे.

--^

हाय व्हॅल्युम लो स्पीड पंख्याचे किफायतशीर असण्यासोबत अनेक फायदे आहेत. हे पंखे हवा जास्त जागेत समान हवा देतात. १.२ किलोवॅट मोटर क्षमतेचे हे पंखे आहेत, त्यामुळे २०० वॅटच्या २० एयर सर्क्युलेटरला बदलले आहे. या पंख्याच्या हवेचा प्रवाह ३ लाख क्युबिक फूट प्रति मिनीट आहे. या पंख्यामुळे विजेची बचत होते, तसेच आवाजही कमी होतो.

सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे.