एसी लोकलमध्ये ‘हायर क्लास-लोअर क्लास’! परवडणारे दर आकारण्याचे विचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:49 AM2018-01-13T01:49:55+5:302018-01-13T01:55:01+5:30

पश्चिम रेल्वेमार्गावर देशातील पहिली वातानुकूलित लोकल सुरू झाली. एसी लोकलचे दर प्रथम दर्जापेक्षा जास्त आहेत. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला गारेगार प्रवासाचे स्वप्न परवडण्यासारखे नाही. यामुळे एसी लोकलमध्ये ‘हायर क्लास’ आणि ‘लोअर क्लास’ असे दोन विभाग लवकरच येण्याची शक्यता आहे.

'Higher class-lower class' in AC locale! Considering cost-effective rates | एसी लोकलमध्ये ‘हायर क्लास-लोअर क्लास’! परवडणारे दर आकारण्याचे विचाराधीन

एसी लोकलमध्ये ‘हायर क्लास-लोअर क्लास’! परवडणारे दर आकारण्याचे विचाराधीन

Next

- महेश चेमटे

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावर देशातील पहिली वातानुकूलित लोकल सुरू झाली. एसी लोकलचे दर प्रथम दर्जापेक्षा जास्त आहेत. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला गारेगार प्रवासाचे स्वप्न परवडण्यासारखे नाही. यामुळे एसी लोकलमध्ये ‘हायर क्लास’ आणि ‘लोअर क्लास’ असे दोन विभाग लवकरच येण्याची शक्यता आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी शुक्रवारी मुंबई दौ-यावर आले होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बैठक पार पडली.
बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासह मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. एस. खुराना तसेच पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर अश्वनी लोहाणी यांनी सीएसएमटी स्थानकाची पाहणी केली.
बैठकीत मुंबई शहर वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी)-३ अ बाबत चर्चा झाली. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) शहरांच्या विकासासाठी ४९ हजार ५२४ कोटी रुपयांच्या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. एमयूटीपी-३ अ मध्ये २१० एसी लोकल बोगी खरेदी करण्यात येणार आहेत. एसी लोकल फेºयांचे प्रमाण वाढल्यानंतर एसी लोकलमध्ये हायर क्लास आणि लोअर क्लास असे विभाग करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
पहिल्या लोकलमध्ये वातानुकूलित लोकलला अद्याप अपेक्षित प्रतिसाद लाभलेला नाही. परिणामी दर कमी केल्यास प्रवासी एसी लोकलकडे आकर्षित होतील. याबाबत अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाच्या बैठकीत होणार आहे. तत्पूर्वी, एमयूटीपी-३मधील ४७ बोगी या वातानुकूलित असणार आहेत. यामुळे भविष्यात मुंबई उपनगरीय रेल्वेमधील सर्व लोकल या वातानुकूलित असण्याची शक्यता आहे.

तिकीट तपासनिसांसोबत संवाद साधला
सीएसएमटी येथे २६-११च्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली देत पाहणी दौºयाला सुरुवात केली. यानंतर मुख्य जनसंपर्क कार्यालय, मोटारमन गार्ड लॉबी, छत्रपती शिवाजी महाराज भवन, रेल्वे संग्रहालय यांची पाहणी केली. तसेच गँगमन आणि प्रीमियम एक्स्प्रेसमधील तिकीट तपासनीसांसोबत संवाद साधला.

Web Title: 'Higher class-lower class' in AC locale! Considering cost-effective rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.