तरुणांमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्गाचे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 12:41 AM2020-04-18T00:41:35+5:302020-04-18T00:41:59+5:30

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण झालेले रुग्ण मुंबईत आढळून येऊ लागले. तेव्हापासून आतापर्यंत महापालिकेने तब्बल ३० हजार ८९७ चाचण्या केल्या आहेत

The highest coronary infection rate among young people | तरुणांमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्गाचे प्रमाण

तरुणांमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्गाचे प्रमाण

googlenewsNext

शेफाली परब-पंडित 

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका असल्याचा इशारा तज्ज्ञामार्फत दिला जात आहे. मात्र आतापर्यंत मुंबईत आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये २१ ते ३० वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक ४४९ असल्याचे दिसून येत आहे. त्या पाठोपाठ ३१ ते ४० या वयोगटातील रूग्णांचे प्रमाण ३७४ एवढे असल्याची माहिती पालिकेच्या अहवालातून समोर आली आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण झालेले रुग्ण मुंबईत आढळून येऊ लागले. तेव्हापासून आतापर्यंत महापालिकेने तब्बल ३० हजार ८९७ चाचण्या केल्या आहेत. यामध्ये १९३६ लोकांना कोरोनाची लागण झाली असून ११३ लोकांचा मृत्यू झाला आहे. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाबाचा त्रास असलेल्या तसेच ६० वर्षांवरील लोकांना कोरोना धोका अधिक असतो. त्यामुळे अशा नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन पालिका प्रशासन वेळोवेळी करीत आहे. आतापर्यंत मुंबईत सापडलेले एकूण रुग्ण, त्यांच्यातील लक्षणे याबाबत महापालिका प्रशासनाने घेतलेल्या आढाव्यानुसार २१ ते ४० वयोगटामध्ये कोरोना पॉझिटिव्ह अधिक दिसून आले आहेत. तर बऱ्याच ठिकाणी पॉझिटिव्ह असूनही लक्षणे न दिसण्याचे प्रमाणही या वयोगटातच जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र वयोवृद्ध आणि प्रदीर्घ आजार असलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये मृत्यू झालेल्या लोकांचे प्रमाण ७० टक्के असल्याचे समोर आले आहे.

पालिकेच्या अहवालातून उघड : २१ ते ३० वयोगटांत सर्वाधिक लागण

वयोगट बाधित पुरुष (%) स्त्री (%)
0० ते १० ५२ ५० ५०
११ ते २० १५० ५३ ४७
२१ ते ३० ४४९ ५० ५०
३१ ते ४० ३७४ ६२ ३८
४१ ते ५० ३४३ ५७ ४३
५१ ते ६० २९३ ५९ ४१
६१ ते ७० १७० ६४ ३६ 
७१ ते ८० ७० ५३ ४७ 
८१ ते ९० २३ ५२ ४८
९० ते १०० २ ५० ५०
१०० ते ११० वयोगटांत एक रुग्ण आढळला आहे.

वयोगट मृत्यू
६१ ते ७० ३९
५१ ते ६० २९ 
४१ ते ५० १८  
७१ ते ८० ११

Web Title: The highest coronary infection rate among young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.