दिवसभरात २५ हजारांहून अधिक रुग्ण : कोरोनाचे संकट अधिक गडद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णवाढीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. राज्यात गुरुवारी २५ हजार ८३३ नवीन रुग्ण सापडले. मुंबईतही दिवसभरात अडीच हजारांहून अधिक रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक २४ हजार ८९६ रुग्ण एक दिवसात सापडले होते. त्यामुळे राज्यासह मुंबईत कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे.
राज्यात गुरुवारी ५८ मृत्यूंची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २३ लाख ९६ हजार ३४० झाली असून, मृतांचा आकडा ५३ हजार १३८ झाला आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येनेही दीड लाखांचा टप्पा ओलांडला असून, सध्या १ लाख ६६ हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात १२ हजार १७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २१ लाख ७५ हजार ५६५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.७९ टक्के असून, मृत्यूदर २.२२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७९ लाख ५६ हजार ८३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ८ लाख १३ हजार २११ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ७ हजार ७९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
गुरुवारी नोंद झालेल्या ५८ मृत्यूंपैकी ३८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. हे ५ मृत्यू पुणे २, नागपूर १, रायगड १ आणि नांदेड १ असे आहेत. दिवसभरातील ५८ मृत्यूंमध्ये मुंबई ८, नवी मुंबई मनपा १, मीरा भाईंदर मनपा १, वसई विरार मनपा १, पनवेल मनपा ३, नाशिक १, नाशिक मनपा १, अहमदनगर २, जळगाव ६, पुणे १, पुणे मनपा २, सोलापूर १, सातारा ४, बीड १, नांदेड १, नांदेड मनपा १, अमरावती १, अमरावती मनपा २, यवतमाळ ५, वाशिम २, नागपूर ८, वर्धा ४, चंद्रपूर १ आदी रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईत २ हजार ८७७ अधिक रुग्ण
मुंबईत गुरुवारी २ हजार ८७७ नवे रुग्ण आढळून आले असून, ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख ५२ हजार ८३५ वर पोहोचला आहे. मृतांचा एकूण आकडा ११ हजार ५५५ वर पोहोचला आहे.
आकडेवारी
नागपूर - २९२६
मुंबई - २८७७
पुणे - २७९१
नाशिक - १६७५
औरंगाबाद - १२७४
पिंपरी-चिंचवड - १२७२
पुणे ग्रामीण - ९१०
नागपूर ग्रामीण - ९०५
नाशिक ग्रामीण - ७४६
अकोला - ६२६
कल्याण-डोंबिवली - ५६०
जळगाव - ५१८
यवतमाळ - ४५८
ठाणे - ४४३
नांदेड - ४१३