पुण्यातील घरांच्या किंमतीत सर्वाधिक वाढ; मुंबईतील भाव देशात सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 06:40 PM2020-12-16T18:40:31+5:302020-12-16T18:40:45+5:30

Increase in house prices : सात वर्षांत दर ३८ टक्क्यांनी वाढले

The highest increase in house prices in Pune | पुण्यातील घरांच्या किंमतीत सर्वाधिक वाढ; मुंबईतील भाव देशात सर्वाधिक

पुण्यातील घरांच्या किंमतीत सर्वाधिक वाढ; मुंबईतील भाव देशात सर्वाधिक

Next

मुंबई : गेल्या सात वर्षांत देशातील सात प्रमुख महानगरांमधिल घरांच्या किंमतींमध्ये सरासरी १४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे झपाट्याने विस्तारणा-या पुणे शहराच्या परिसरात सर्वाधिक ३८ टक्के दरवाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबई शहरांतील भाव हे देशातील अन्य कोणत्याही शहराच्या तुलनेत सर्वाधिक असले तरी तिथली वाढ ही ११ टक्क्यांवरच असल्याची माहिती अँनराँक पाँपर्टीने प्रसिध्द केलेल्या एका सर्वेक्षण अहवालातून पुढे आली आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रति चौरस फूटांसाठी सरासरी ४,५८० रुपये आकारले जात आहेत. मुंबईतला दर त्यापेक्षा दुपटीने जास्त असून इथल्या मालमत्तांचा सरासरी दर १० हजार ६१० रुपयांवर गेला आहे. दिल्लीपेक्षा पुण्यातील मालमत्तांची किंमतही जास्त असल्याचे अँनराँकचा अहवाल सांगतो. २०१६ सालापासून जीएसटी, नोटबंदी, रेरा आदी कारणांमुळे मालत्तांच्या भाववाढीला ग्रहण लागले आहे. मात्र, गेल्या सात वर्षांचा आलेख मांडला तर या दरांमध्ये सरासरी १४ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहेत. कोरोना संक्रमाणाच्या काळात घराच्या विक्रीला लागलेले ग्रहण दूर करण्यासाठी विकासकांना किंमती कमी केल्या आहेत. त्यानंतरही हे दर २०१३ च्या तुलनेत जास्तच असल्याचेही अधोरेखीत होत आहे.

इन्व्हेस्टर्स पुन्हा गृह खरेदीकडे वळणार ?

पूर्वी घरांच्या २० टक्के खरेदीचा वाटा हा गुंतवणूकदारांचा (इन्व्हेस्टर्स) असायचा. मात्र, गेल्या दोन वर्षांत घरांच्या किंमतीत अपेक्षित वाढ होत नसल्याने तो टक्का कमी झाला असून प्रत्यक्ष वापर करणा-यांकडूनच गृह खरेदी केली जात आहे. परंतु, आता पुन्हा या गुंतवणूकदारांमध्ये आशेचा किरणा निर्माण झाला असून त्यांच्याकडून खरेदीचे व्यवहार वाढतील अशी शक्यता अँनराँकच्या रिसर्च टीमचे संचालक प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

  

निवासी मालमत्तांच्या किंमतीत गेल्या सात वर्षांत झालेली भाववाढ (दर प्रति चौ.मी)

 

शहर

२०१३

२०२०

वाढ (टक्के)

पुणे

३९८०

५५१०

३८

मुंबई

९५७८

१०६१०

११

दिल्ली

४४८८

४५८०

कोलकत्ता

३८५०

४३८५

१४

हैद्राबाद

३४८५

४१९५

२०

चेन्नई

४७७०

४९३५

बंगळूरू

४१२०

४९५५

२०

एकूण

४८९५

५५९९

१४

 

Web Title: The highest increase in house prices in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.