Join us

राज्यात सर्वाधिक ८११ नवे रुग्ण, एकूण रुग्ण ७६२८, २२ मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 6:04 AM

मात्र असे असूनही राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक वाढतच आहे.

मुंबई : राज्यात कोरोनावरील उपचारपद्धतींवर विविध प्रयोग होत आहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटते आहे. मात्र असे असूनही राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक वाढतच आहे. राज्यात शनिवारी ८११ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, रुग्णसंख्या ७ हजार ६२८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात २२ मृत्यूंची नोंद झाली असून, ३२३वर पोहोचली आहे. तर मुंबईतही २८१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, रुग्णसंख्या ५ हजार ४९ झाली आहे. दिवसभरात मुंबईत १३ मृत्यू झाले असून, मृत्यूंचा आकडा १९१ इतका झाला आहे. 125393 लोक सध्या घरगुती अलगीकरणात आहेत. तर ८ हजार १२४ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. १ लाख ८ हजार ९७२ नमुन्यांपैकी १ लाख १ हजार १६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस