६० वर्षांतील सर्वाधिक वीजनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:06 AM2021-03-10T04:06:55+5:302021-03-10T04:06:55+5:30
१० हजार ४४५ मेगावॅट वीजनिर्मितीचा उच्चांक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महानिर्मितीने मंगळवारी दुपारी ४.४० वाजता एकूण १० ...
१० हजार ४४५ मेगावॅट वीजनिर्मितीचा उच्चांक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महानिर्मितीने मंगळवारी दुपारी ४.४० वाजता एकूण १० हजार ४४५ मेगावॅट वीजनिर्मिती साध्य करून औष्णिक वीजनिर्मितीमध्ये एक विक्रमी शिखर सर केले. महानिर्मितीच्या ६० वर्षांतील सर्वोच्च वीजनिर्मितीचा हा नवा उच्चांक आहे.
मुंबईसह राज्याच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच आता उकाडाही वाढला आहे. त्यामुळे ७ मार्चपासून विजेची मागणी वाढली आहे. त्यानुसार विजेची निर्मिती करून पुरवठा केला जात आहे. मंगळवारचा उच्चांक गाठताना महानिर्मितीने २० मे २०१९ रोजीचा १० हजार ९८ मेगावॅटचा उच्चांक मोडला.
------------
वीजनिर्मिती
- औष्णिक वीजनिर्मितीद्वारे ७,९९१ मेगावॅट
- वायू वीजनिर्मिती केंद्राद्वारे २६४ मेगावॅट
- जल विद्युत केंद्राद्वारे २,१३८ मेगावॅट
- सौरऊर्जा प्रकल्पामधून ५० मेगावॅट
------------
आकडा गाठण्याची तिसरी वेळ
- महावितरणची विजेची मागणी २२ हजार १२९ मेगावॅट.
- राज्याची एकूण वीजनिर्मिती १६ हजार ४२९ मेगावॅट इतकी होती.
- १० हजारपेक्षा जास्त वीजनिर्मितीचा आकडा पुन्हा गाठण्याची ही तिसरी वेळ आहे.
- ८ मार्च रोजीही महानिर्मितीने १० हजार ९७ मेगावॅट तर २० मे २०१९ रोजी १० हजार ९८ मेगावॅट विजेची निर्मिती केली हाेती.
.............................................