तलावांमध्ये मागच्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक जलसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 01:19 AM2020-09-08T01:19:20+5:302020-09-08T01:19:25+5:30
पुढील पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
मुंबई : मान्सूनचे दोन महिने कोरडे गेल्यामुळे मुंबईत पेटलेला पाणीप्रश्न अखेर मिटला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २०१८ आणि २०१९ च्या तुलनेत अधिक जलसाठा आता जमा झाला आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
जुलैअखेरीस तलाव क्षेत्रात केवळ ३४ टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने महापालिकेने ५ आॅगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू केली. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने मुंबईसह तलाव क्षेत्रात चांगलाच जोर धरला. त्यामुळे आॅगस्टच्या तिसºया आठवड्यात तलावांमध्ये चांगला जलसाठा जमा झाला. परिणामी, पालिका प्रशासनाने २१ आॅगस्ट रोजी १० टक्के आणि उर्वरित १० टक्के २९ आॅगस्ट रोजी मागे घेतली.
वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. आतापर्यंत तुळशी, विहार, मोडकसागर, तानसा हे तलाव भरून वाहिले आहेत. तर अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा काठोकाठ भरले आहेत.
जलसाठ्याची आकडेवारी(मीटर्समध्ये)
तलाव कमाल किमान उपयुक्त साठा सध्या
(दशलक्ष)
मोडकसागर १६३.१५ १४३. २६ १२८३१० १६३.००
तानसा १२८.६३ ११८.८७ १४४८२८ १२८.६१
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.१५
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८००२ १३९.१४
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ २१९८१५ ६०३.२८
भातसा १४२.०७ १०४.९० ७०१९४७ १४१.५२
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १८७३२९ २८३.८६
७ सप्टेंबर रोजी
तलावांमध्ये जलसाठा
वर्ष जलसाठा (दशलक्ष लीटर) टक्के
२०२० १४१७९३१ ९७.९७
२०१९ १४१५९७८ ९७.८३
२०१८ १३९७६८१ ९६.५७