Join us

हायप्रोफाईल वयोवृद्ध ठग गजाआड

By admin | Published: October 13, 2015 2:59 AM

परदेशी पर्यटकांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांच्याकडील मौल्यवान सामान लंपास करणाऱ्या ईश्वर मलाली (६०) या हायप्रोफाईल ठगाला रेल्वे पोलिसांनी गजाआड केले.

मनीषा म्हात्रे, मुंबईपरदेशी पर्यटकांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांच्याकडील मौल्यवान सामान लंपास करणाऱ्या ईश्वर मलाली (६०) या हायप्रोफाईल ठगाला रेल्वे पोलिसांनी गजाआड केले. त्याचे कुटुंबीय विदेशात राहत असून, त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल करत, तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.मूळचा आंध्रप्रदेशचा आणि बीएससीची पदवी घेतलेला मलाली एका कंपनीत बड्या पदावर कार्यरत होता. वाढत्या वयामुळे नोकरी सोडल्यावर कुटुंबीयांनीही त्याला नाकारले. एकाकी पडलेला मलाली मुंबई, दिल्ली, कोलकातासारख्या शहरांमध्ये फेरफटका मारून वेळ घालवू लागला. इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे परदेशी पर्यटकांना भुलवण्याचे त्याने ठरविले. यासाठी त्याने मुंबई शहर निवडले.पर्यटकांना बोलण्यात गुंतवून तो त्यांची बॅग घेऊन पळ काढत असे. त्यात महत्त्वपूर्ण कागदपत्रे सापडली, तर तो ही कागदपत्रे जीआरपीकडे सुपूर्द करायचा. विदेशी वस्तूंची हाव वाढल्याने त्याने हा दिनक्रमच बनवला होता. या पैशांतून दादर येथील बड्या हॉटेलमध्ये राहून तो ऐशआरामाचे जीवन जगत होता. नंतर पैसे घेऊन आंध्रप्रदेशला रवाना व्हायचा.अशात महिनाभरात परदेशी पर्यटकांच्या फसवणुकीचे पाच गुन्हे समोर आल्याने रेल्वे पोलीसही चक्रावले. याबाबत अधिक तपास करत असताना, २७ सप्टेंबर रोजी सीसीटीव्ही फुटेज तपासणीत मलालीच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्या. त्यामुळे पोलीस त्याच्यावर नजर ठेऊन होते, पण बरेच दिवस तो सीएसटीवर फिरकलाच नाही. अशात शुक्रवारी मलाली एका नायजेरीयनला गंडा घालण्याच्या प्रयत्नात असताना, सीएसटीच्या जीआरपी पोलिसांचे लक्ष त्याच्यावर गेले. सीएसटी जीआरपीचे पीएसआय बबन कोयले, एसआय नारायण रोमन, पोलीस हवालदार प्रभाकर साबळे, पोलीस शिपाई गणेश सानप, कैलास पवार यांच्या पथकाने मलालीच्या मुसक्या आवळल्या.