Join us  

अपहृत भारतीयांचा ठावठिकाणा लागला

By admin | Published: June 20, 2014 3:09 AM

इराकमधील मोसूल शहरातून अपहरण करण्यात आलेल्या 4क् भारतीय कामगारांचा ठावाठिकाणा कळला आहे, असे भारत सरकारने आज जाहीर केले.

नवी दिल्ली : इराकमधील मोसूल शहरातून अपहरण करण्यात आलेल्या 4क् भारतीय कामगारांचा ठावाठिकाणा कळला आहे, असे भारत सरकारने आज जाहीर केले. 
अपहरण झालेल्या भारतीयांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांच्या सुखरूप मुक्ततेसाठी भारत सरकार शक्य ते प्रयत्न करीत आहे, बगदाद येथील भारतीय दूतावास यासंदर्भात सातत्याने इराकी अधिका:यांच्या संपर्कात आहे. इराकच्या परराष्ट्र मंत्रलयाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय व इतर देशांच्या अपहृतांना कोठे ठेवले आहे याची माहिती मिळाली आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ता सईद अकबरुद्दीन यांनी सांगितले. भारतीय अपहृतांना कोठे ठेवले आहे असे विचारले असता, त्यांनी ही माहिती देण्यास नकार दिला. इराकी अधिका:यांनी दिलेली माहिती या टप्प्यावर मी सांगू शकत नाही, असे अकबरुद्दीन म्हणाले. हे भारतीय सुरक्षित आहेत काय असे विचारले असता, ओलिसांना सुरक्षा असत नाही असे उत्तर त्यांनी दिले. या कामगारातील बहुतांश पंजाब व उत्तर भारतातील आहेत. मोसूल येथील एका बांधकाम कंपनीत ते काम करत होते. आयसीस या सुन्नी दहशतवाद्यांच्या गटाने त्यांचे अपहरण केले आहे. 
इराक सरकारने भारतीय कामगारांचे अपहरण झाल्याचे खात्रीपूर्वक सांगितले आहे. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4पराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुपच्या दोन बैठका झाल्या. अपहरण झालेले 4क् भारतीय कामगार व तिक्रीत येथे अडकलेल्या 46 भारतीय नर्स यांच्या सुरक्षिततेची भारत सरकारला काळजी आहे. आखाताची जबाबदारी असणारे सचिव अनिल वधवा यांनी इराकचे राजदूत अहमद तहसीन अहमद बेरवारी यांच्याशी दोनवेळा संवाद साधला आहे, असे अकबरुद्दीन म्हणाले. 
खंडणीची मागणी नाही
4अपहृत कामगारांच्या सुटकेसाठी खंडणीची मागणी करण्यात आलेली नाही. भारत विविध मानवतावादी संघटनांच्या संपर्कात आहे. इराकमधील माजी भारतीय राजदूत सुरेश रेड्डी बगदादला पोहोचले असून, इराकी अधिका:यांबरोबर बैठका घेत आहेत.