मुंब्य्रात रिक्षांची भाडेवाढ?
By admin | Published: November 17, 2014 11:03 PM2014-11-17T23:03:34+5:302014-11-17T23:03:34+5:30
काही दिवसांपूर्वी सीएनजी तसेच् रिक्षा देखभालीचे दर वाढले. या खर्चात झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ करण्यात येणार असून, ती टप्प्या प्रमाणे प्रती प्रवासी २ ते ५ रु. इतकी असणार आहे.
मुंब्रा : कौसा-कल्याण फाटा याच प्रमाणे कळव्यातील विविध गृहसंकुले तसेच खारेगाव परिसरात रहाणाऱ्या बहुसंख्य नागरिकांचे प्रवासाचे प्रमुख साधन असलेल्या शेअर रिक्षाच्या दरांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये वाढ करण्यात येणार असून, या बाबत प्रत्यक्ष कायदेशीर कार्यवाही सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी सीएनजी तसेच् रिक्षा देखभालीचे दर वाढले. या खर्चात झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ करण्यात येणार असून, ती टप्प्या प्रमाणे प्रती प्रवासी २ ते ५ रु. इतकी असणार आहे.
ठाणे वाहतूक शाखेच्या एका निरिक्षकांने या भाडे वाढी संदर्भात अहवाल तयार करण्या साठी नुकताच या बाबत चाचपणी केली. भाडेवाढीबाबत मुंब्य्रातील रिक्षा संघटनेची ठाणे वाहतूक शाखेशी चर्चा सुरु असल्याचे मुंब्रा वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरिक्षक गौरी प्रसाद हिरेमठ यांनी सांगितले. (वार्ताहर)