Join us

चुनाभट्टीत डोंगरावरील घर कोसळले; एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 4:07 AM

चुनाभट्टीत डोंगराच्या कडेला असलेले मोहम्मद इलियास खान यांचे घर गुरुवारी दुपारी कोसळले.

मुंबई : चुनाभट्टीत डोंगराच्या कडेला असलेले मोहम्मद इलियास खान यांचे घर गुरुवारी दुपारी कोसळले. या दुर्घटनेत त्यांची १४ वर्षांचीमुलगी ३० फूट खाली कोसळून गंभीर जखमी झाली. तिला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चुनाभट्टीतील स्मशानभूमी रोड येथील डोंगरावरील कुरेश नगरमध्ये डोंगरावर अनेक घरांमध्ये कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथील संपूर्ण डोंगर हा घरांनी व्यापलेला आहे. त्यामध्ये दुपारी येथील डोंगराच्या कडेला असलेले मोहम्मद इलियास खान यांचे दुमजली राहते घर अचानक कोसळले. घरात असलेली त्यांची १४ वर्षांची मुलगी इकरा खान ही ३० फूट खाली पडली. प्रसंगावधान राखून शेजाऱ्यांच्या मदतीने तासाभरानंतर तिला ढिगाºयाघालून बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आले.