Join us

डोंगरी, मरीन लाईन्स कोरोनामुक्तीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:07 AM

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मुंबईत आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०५ टक्के एवढा ...

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मुंबईत आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०५ टक्के एवढा आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजार २६७ आहे. त्यामुळे २४ प्रशासकीय विभागांपैकी बहुतांशी भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. यापैकी डोंगरी आणि मरीन लाईन हे दोन विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत.

फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला. मार्च - एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत गेली. दररोजच्या रुग्णांची संख्या नऊ ते दहा हजारांवर पोहोचली होती. या काळात वांद्रे, चेंबूर, गोवंडी हे परिसर हॉट स्पॉट बनले होते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची चाचणी, बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे विलगीकरण, तात्काळ निदान आणि वेळेत उपचार हे सूत्र पालिकेने अवलंबिले.

त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार गेल्या महिन्यापासून नियंत्रणात येऊ लागला. आता दररोजच्या रुग्णांची संख्याही साडेतीनशेवर आली आहे, तर ५८ हजार नागरिक गृह विलगीकरणात आहेत. दरम्यान, मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १३८३ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील सर्व विभागांमधील दैनंदिन रुग्णवाढ ०.०२ टक्के ते ०.०७ टक्के एवढी आहे, तर डोंगरी महिलांची या विभागात हीच वाढ ०.०२ टक्के आहे.

...या विभागात रुग्णवाढ ०.०५ टक्क्यांपेक्षा कमी

विभाग दैनंदिन रुग्णवाढ

बी... डोंगरी...०.०२

सी.... मरीन लाईन्स ०.०२

एफ दक्षिण..परळ...०.०३

एन ...घाटकोपर ..०.०३

पी उत्तर... मालाड ०.०३

एल...कुर्ला...०.०४

के पूर्व...जोगेश्वरी, अंधेरी पूर्व...०.०४

पी दक्षिण ..गोरेगाव.....०.०४

एम पश्चिम...चेंबूर...०.०४

सर्वाधिक सक्रिय रुग्ण

के पश्चिम...अंधेरी प. ४६७

आर मध्य...बोरिवली ४३०

आर दक्षिण...कांदिवली...३७९

के पूर्व...अंधेरी पूर्व...३१४