Join us

हिल्टन तोडफोड १७ अटकेत

By admin | Published: January 11, 2015 11:36 PM

तालुक्यातील घोणसई गावाच्या हद्दीतील हिल्टन मेटल फोर्जिंग या कंपनीत शनिवारी (दि.१०) कंपनी व्यवस्थापकांनी भाडोत्री गुंड आणून कामगारांना धाक दाखवून बेदम मारहाण केली होती.

वाडा : तालुक्यातील घोणसई गावाच्या हद्दीतील हिल्टन मेटल फोर्जिंग या कंपनीत शनिवारी (दि.१०) कंपनी व्यवस्थापकांनी भाडोत्री गुंड आणून कामगारांना धाक दाखवून बेदम मारहाण केली होती. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी कंपनीची मोडतोड करीत ५ गाड्यांचे नुकसान केले होते. या प्रकरणी १५ भाडोत्री गुंडासह १७ कामगारांना वाडा पोलिसांनी आज अटक केली आहे.तालुक्यातील घोणसई गावाच्या हद्दीत हिल्टन मेटल फोर्जिंग ही कंपनी आहे. या कंपनीत लोखंडाचे उत्पादन केले जाते. या कंपनीतील सुमारे १०० कामगारांनी ‘कामगार एकता’ या संघटनेचे सदस्यत्व स्विकारले आहे. हे कांपनीला मान्य नव्हते. त्यांनी युनियन तोडण्यासाठी शनिवारी सायंकाळी १५ भाडोत्री गुंड आणून कामगारांना धमकविण्यास सुरुवात केली. तर काहींनी चाकू व तलवारीचा धाक दाखविला. त्यानंतर कामगारांना मारहाण केली व या मारहाणीची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावातील ग्रामस्थ मुलांसह कंपनीच्या प्रवेशद्वारा जवळ जमले कामगारांना गुंडांनी मारहाण केल्याचे स्थानिक कामगारांनी सांगताच ग्रामस्थ प्रचंड संतापले आणि त्यांनी कंपनीवर हल्लाबोल करीत कंपनीची मोडतोड करीत कंपनीच्या पाच गाड्यांचीही मोडतोड केली. (वार्ताहर)