मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या पोलीस मुख्यालयातील आस्थापना विभागाच्या प्रमुखपदी अखेर अपर पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृहविभागाने नुकताच त्याबाबतचा आदेश जारी केले आहेत.सुमारे साडेपाच महिन्यांपासून अपर महासंचालक (आस्थापना) पद रिक्त होते. पोलीस मुख्यालयातील अन्य अपर महासंचालकांकडे त्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येत होता. दीर्घ रजेवर असलेले हिमांशू रॉय लवकर पदभार स्वीकारणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या त्याचा अतिरिक्त पदभार राजेंद्र सिंह यांच्याकडे आहे. उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्या आणि त्याहून वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढतीबाबतचे प्रस्ताव बनविण्याची जबाबदारी असलेल्या आस्थापना विभागाचे तत्कालीन अपर महासंचालक व्ही.डी. मिश्रा यांची मे महिन्यात पदोन्नतीवर पोलीस गृहनिर्माण विभागात बदली करण्यात आली, तेव्हापासून या ठिकाणी पूर्ण वेळ अधिकारी नेमण्यात आलेला नाही. (प्रतिनिधी)
हिमांशू रॉय यांची आस्थापना विभागात नियुक्ती
By admin | Published: November 18, 2016 5:47 AM