हिमांशू रॉय यांची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 06:53 PM2018-05-11T18:53:46+5:302018-05-11T18:54:47+5:30
हिमांशू रॉय यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जीटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आज रात्री 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुंबई: राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी शुक्रवारी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण न समजल्यामुळे वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. परंतु, काहीवेळापूर्वीच मुंबई पोलिसांनी परिपत्रक काढून हिमांशू रॉय यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट सापडल्याचे सांगितले. आजारपणातून आलेल्या नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे. त्यामुळे हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येविषयीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. हिमांशू रॉय यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जीटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आज रात्री 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
याशिवाय, मुंबई पोलिसांनी आपल्या परिपत्रकात हिमांशू रॉय आणि त्यांच्या कुटुंबियांना एकांत देण्याची प्रसारमाध्यमांना विनंती केली आहे. हिमांशू रॉय मागील दोन वर्षांपासून दुर्धर कर्करोगाने ग्रस्त असल्याने वैद्यकीय रजेवर होते व त्यांच्यावर तज्ञांकडून उपचार सुरु होते. दुपारी १.४० च्या दरम्यान राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
According to a statement released by Mumbai Police, #HimanshuRoy committed suicide as he was suffering from Cancer. The same has been mentioned in the suicide note recovered by the police. pic.twitter.com/rVp2i7LjVC
— ANI (@ANI) May 11, 2018