हिमेश रेशमियाने घेतला घटस्फोट

By admin | Published: June 7, 2017 06:33 PM2017-06-07T18:33:13+5:302017-06-07T18:36:02+5:30

बी टाऊनमध्ये जोड्या बनणे आणि तुटणे ही आता सामान्य बाब बनली आहे. गेल्या काही काळात अनेक आघाडीच्या कलाकारांनी

Himesh Reshammiya took divorce | हिमेश रेशमियाने घेतला घटस्फोट

हिमेश रेशमियाने घेतला घटस्फोट

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - बी टाऊनमध्ये जोड्या बनणे आणि तुटणे ही आता सामान्य बाब बनली आहे. गेल्या काही काळात अनेक आघाडीच्या कलाकारांनी आपल्या जोडीदारांपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला होता. आता यात अजून एका आघाडीच्या संगीतकाराची भर पडली आहे.
बॉलीवूडमधील आघाडीचा संगीतकार आणि आशिक बनाया आपने, तेरा सुरूरसारख्या सुपरहिट गीतांचा गायक हिमेश रेशमिया याने पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे.  मतभेद झाल्यानंतर हिमेश रेशमिया आणि त्याची पत्नी कोमल यांनी सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला आज मंजुरी दिली आहे. 
"आम्ही परस्पर सहमतीने नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आमच्यातील पती-पत्नीचे नाचे संपले तरी मी कोमलच्या आणि कोमल माझ्या परिवराचा भाग राहील,"" असे हिमेश घटस्फोटानंतर म्हणाला. वयाच्या 21 व्या वर्षी  हिमेशने कोमलशी विवाह केला होता. त्यांना स्वयम नावाचा मुलगाही आहे. मात्र 2016 साली त्यांनी परस्पर सहमतीने  घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. 
"विवाहानंतर आम्ही एकमेकांसाठी अनुरूप नसल्याचे आमच्या लक्षात आले. त्यानंतर आम्ही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  आम्ही एकमेकांचे मार्ग वेगवेगळे केले असले तरी आमच्यातील एकमेकांप्रतिचा आदर कमी झालेला नाही. घटस्फोट झाल्यानंतरही आमचे एकमेकांच्या कुटुंबाबरोबरचे संबंध कायम राहतील,"असे हिमेशची पत्नी कोमल हिने सांगितले आहे.   

Web Title: Himesh Reshammiya took divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.