हिंदमाता येथे डम्परखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 03:48 AM2018-10-25T03:48:32+5:302018-10-25T03:48:41+5:30
नवीन टॅक्सीच्या नोंदणीसाठी ताडदेव आरटीओच्या दिशेने निघालेल्या तरुणाची दुचाकी सरकल्याने तो खाली पडला.
मुंबई : नवीन टॅक्सीच्या नोंदणीसाठी ताडदेव आरटीओच्या दिशेने निघालेल्या तरुणाची दुचाकी सरकल्याने तो खाली पडला. आणि पाठीमागून आलेल्या डम्परखाली चिरडून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंदमाता परिसरात बुधवारी घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी डम्पर चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
वडाळा येथील भीमवाडी परिसरात प्रवीण सिंग (२३) कुटुंबीयांसोबत राहायचा. त्याला नुकतीच एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली. त्याच्या घरच्यांनी नवीन टॅक्सीही खरेदी केली. बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी तो ताडदेवच्या आरटीओ कार्यालयाकडे निघाला. हिंदमाता परिसरात त्याची दुचाकी घसरल्याने तो खाली पडला. त्याच दरम्यान पाठीमागून आलेल्या डम्पर त्याच्या डोक्यावरून गेला. या अपघातात तो जागीच ठार
झाला.
>२४ तासांत दोघांचा बळी
देवनारमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत वैभव जंगम (३२) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता घडली. जंगम हा वाशीचा रहिवासी आहे. या प्रकरणी देवनार पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेपूर्वी सोमवारी रात्री ८ च्या सुमारास कारच्या धडकेत मुबारक अली सिद्दिकी (५२) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी देवनार पोलीस अधिक तपास करीत आहेत.