लग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 10:28 AM2018-11-15T10:28:49+5:302018-12-13T13:09:03+5:30

12 डिसेंबरला ईशा आणि आनंद विवाहबंधनात अडकणार

hindustan unilever old property will be marital gift for isha and anand piramal | लग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार

लग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार

googlenewsNext

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी डिसेंबरमध्ये विवाहबद्ध होणार आहे. ईशाचा विवाह आनंद पिरामल यांच्याशी होईल. यानंतर हे नवदाम्पत्य वरळी सीफेसला राहायला जाईल. ईशा अंबानी सध्या अँटेलियामध्ये वास्तव्यास आहे. मुकेश अंबानी यांचं हे निवासस्थान देशातील सर्वात महागड्या निवासस्थानांपैकी एक आहे. मात्र ईशा अंबानी यांचं नवं घरदेखील सोयीसुविधांनी युक्त आहे. 

मुलगा आनंदसाठी वडिल अजय पिरामल यांनी तब्बल 452 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. ईशा आणि आनंद 12 डिसेंबरला विवाहबद्ध होतील. यानंतर हे दाम्पत्य वरळी सीफेसला राहायला जाईल. ईशा आणि आनंद यांचा हा नवा बंगला पाच मजल्यांचा आहे. हा बंगला 50 हजार चौरस फुटांचा आहे. आनंद यांचे आई-वडिल अजय आणि स्वाती पिरामल यांच्याकडून हा बंगला आनंद आणि इशा यांना गिफ्ट म्हणून देण्यात येईल. 



ईशा आणि आनंद यांच्या नव्या बंगल्याच्या बेसमेंटमध्ये तीन मजले आहेत. याचा वापर सर्विस आणि पार्किंगसाठी करण्यात येईल. यानंतर बेसमेंटला एक लॉन, ओपन एयर वॉटर बॉडी आणि डबल हाईट मल्टिपर्पज रुम आहे. याशिवाय तळमजल्याला एक एंट्रन्स लॉबी आहे. त्यानंतर वरच्या मजल्यावर लिविंग रुम, डायनिंग हॉल, ट्रिपल हाईट मल्टिपर्पज रुम, बेडरुम आणि सर्क्युलर स्टडीज आहे. 

आनंद यांचे वडिल अजय पिरामल यांच्याकडे पिरामल समूहात मोठी जबाबदारी आहे. अजय पिरामल तब्बल 10 अब्ज डॉलरचा कारभार सांभाळतात. यामध्ये अर्थसेवा, रियल इस्टेट, आयटी आणि ग्लास पॅकेजिंग व्यवसायांचा समावेश आहे. 
 

Web Title: hindustan unilever old property will be marital gift for isha and anand piramal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.