Hindustani Bhau: धारावीत शिक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामागे 'हिंदुस्थानी भाऊ'चा हात?, विद्यार्थीही बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 04:00 PM2022-01-31T16:00:32+5:302022-01-31T16:01:21+5:30
Hindustani Bhau: मुंबईतल्या धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनाला तोडफोडीचं गालबोट लागलं असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं पोलिसांना जमावाला थोपण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला आहे.
Hindustani Bhau: मुंबईतल्या धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनाला तोडफोडीचं गालबोट लागलं असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं पोलिसांना जमावाला थोपण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला आहे.
धारावीत दहावी, बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांचा जमाव कसा झाला? त्यांना नेमकं कुणी बोलावलं होतं? याची माहिती विद्यार्थ्यांना विचारण्यात आली असता अनेकांनी 'हिंदुस्थानी भाऊ'चं नाव घेतलं आहे. 'हिंदुस्थानी भाऊ' धारावीत आंदोलनात सहभागी देखील झाला होता याचा व्हिडिओ त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवर देखील पाहायला मिळत आहे.
राज्यात केवळ धारावीतच नव्हे, तर नागपूर, सातारा, कराड इतर काही ठिकाणी देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे हे नियोजन करुन आंदोलन करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. तसंच हिंदुस्थानी भाऊच्या इन्स्टाग्राम अकाऊंट देखील त्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊ धारावीत आंदोलनात सामील झाला होता आणि त्यानंच केलेल्या आवाहनानंतर विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणात जमा झाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
'हिंदुस्थानी भाऊ'चा पोलिसांकडून शोध सुरू
हजारो विद्यार्थी नियोजन पद्धतीनं शिक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर जमा होऊन तोडफोड केल्याच्या या घटनेमागे 'हिंदुस्थानी भाऊ' असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील 'हिंदुस्थानी भाऊ'चा शोध घेण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.
'हिंदुस्थानी भाऊ'च्या सांगण्यावरून ही गर्दी येथे जमली. तसेच हे ठरवून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना भडकावण्यात आले आहे. तसेच, हिंदुस्थानी भाऊ विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.