Hindustani Bhau : अखेर हिंदुस्थानी भाऊला अटक, पोलिसांनी रात्री उशिरा केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 08:43 AM2022-02-01T08:43:29+5:302022-02-01T08:46:02+5:30

मुंबईत जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीबाबत मुंबई पोलिसांसह राज्य गुप्तचर विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. ज्या पालकांना आपली मुले असे आहे करत आहेत, हे माहिती नव्हते

Hindustani Bhau: Finally Hindustani Bhau means vikas phatak was arrested, police filed a case late last night | Hindustani Bhau : अखेर हिंदुस्थानी भाऊला अटक, पोलिसांनी रात्री उशिरा केला गुन्हा दाखल

Hindustani Bhau : अखेर हिंदुस्थानी भाऊला अटक, पोलिसांनी रात्री उशिरा केला गुन्हा दाखल

googlenewsNext

मुंबई - दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील चिथावणीखोर वक्तव्याला प्रतिसाद देत सोमवारी मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उरतल्याने मोठा तणाव निर्माण झाला. अनेक ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली. धक्कादायक म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच या आंदोलनाच्या स्थळासह वेळेबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीबाबत मुंबई पोलिसांसह राज्य गुप्तचर विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. ज्या पालकांना आपली मुले असे आहे करत आहेत, हे माहिती नव्हते. ते पालक आता आपल्या मुलांवर गुन्हे तर दाखल होणार नाहीत ना? या चिंतेत आहेत. याप्रकरणी आता, गुन्हा दाखल करुन हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली आहे. 

धारावी पोलीस ठाण्यात विकास जयराम पाठक (हिंदुस्थानी भाऊ), (41 वर्षे रा. ठि.19/बी प्यारीनगर गोविंद पाटील खार दांडा,खार पश्चिम मुंबई.) विरोधात रजिस्टर क्रमांक ३७/२०२२ कलम ३५३,३३२,४२७,१०९, ११४,१४३,१४५,१४६,१४९,१८८,२६९,२७० भा.द.वि सह कलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह कलम 37 (३),१३५ जमाव बंदी आदेश भंगसह कलम 3 महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्थानी भाऊसह इकरार खान वखार खान (वय 25 वर्षे) यासही पोलिसांनी अटक केली आहे. 

गर्दी जमा होण्यास सुरुवात

सोमवारी दुपारी १२ वाजेपासून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ विद्यार्थ्यांची गर्दी  जमण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एकच्या सुमारास हिंदुस्थानी भाऊनेही तेथे हजेरी लावून चिथावणीखोर वक्तव्य केले. ही विद्यार्थ्यांची ताकद आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन शिक्षण मंत्र्याना देत आहे. एवढे करून दुर्लक्ष केल्यास यापेक्षा मोठ्या प्रमाणात गर्दी येथे दिसून येईल. हे सगळे हक्काच्या लढाईसाठी उभे असल्याचे नमूद करत गर्दीचा व्हिडिओ फाटक याने शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दुपारी गर्दीत आणखी भर पडली. दुपारी ३ वाजेपर्यंत येथे हजारो विद्यार्थ्यांचा जमाव जमल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी अधिकचा फौजफाटा तैनात केला. पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी आंदोलनस्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा गोंधळ कायम होता. आम्हाला न्याय हवा म्हणत, त्यांची घोषणाबाजी सुरू होती. 

कोण आहे हिंदुस्थानी भाऊ

६ ऑगस्ट १९८३ रोजी जन्मलेला विकास जयराम फाटक हा हिंदुस्थानी भाऊ नावाने सोशल मीडियात वावरतो. त्याच्या मते भारत वा भारतीय संस्कृतीच्या विरोधात जे लोक आहेत त्यांच्या विरोधात तो आवाज उठवतो. तो भारत, भारताबाहेरील नेत्यांना अर्वाच्य शिव्या देत असतो. त्याचे फेसबूक, इन्स्ट्राग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. 
- आतापर्यंत तो कितीही बरळला तरीही त्याच्यावर कारवाई झालेली नाही, त्यातून त्याची हिंमत वाढली. इन्स्ट्रागाम, फेसबुकवरील व्हिडिओंमध्ये त्याने अत्यंत अश्लील भाषा वापरली आहे. अंगावर सोन्याचे दागिने घालून संजय दत्तच्या आवेशात बोलणे ही त्याची स्टाइल आहे.
- बिग बॉसच्या १३ व्या पर्वातही तो सहभागी झाला होता. पाकिस्तान, दहशतवाद्यांना शिवराळ बोलून तो प्रसिद्धी मिळवत आहे. 

मी कुठल्या पक्षाशी किंवा संघटनेशी जोडलेलो नाही. मी फक्त विद्यार्थ्यांसाठी उभा आहे. विद्यार्थी तणावात आहेत. याबाबतचे संदेश मला येत होते. मी फक्त त्यांचा आवाज बनून सोबत उभे राहण्यासाठी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकला. हजारो विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले. माझ्या मुलांनी कुणाला त्रास दिला नाही.     
- विकास फाटक

Web Title: Hindustani Bhau: Finally Hindustani Bhau means vikas phatak was arrested, police filed a case late last night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.