Hindustani Bhau: ...तर आज ही वेळच आली नसती; 'हिंदुस्थानी भाऊ'ची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 05:14 PM2022-01-31T17:14:41+5:302022-01-31T17:15:37+5:30

राज्यात इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घ्याव्यात या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. यात काही ठिकाणी तोडफोड देखील करण्यात आली आहे.

hindustani bhau first reaction on student agitation in dharavi | Hindustani Bhau: ...तर आज ही वेळच आली नसती; 'हिंदुस्थानी भाऊ'ची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया

Hindustani Bhau: ...तर आज ही वेळच आली नसती; 'हिंदुस्थानी भाऊ'ची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया

googlenewsNext

मुंबई-

राज्यात इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घ्याव्यात या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. यात काही ठिकाणी तोडफोड देखील करण्यात आली आहे. तसंच आंदोलकांना थोपविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. मुंबईतील धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं. अचानक झालेल्या गर्दीमुळे पोलिसांचीही भंबेरी उडाली. आंदोलन ठिकाणी 'हिंदुस्थानी भाऊ' या युट्यूब स्टारनं हजेरी लावल्यानंतर या विद्यार्थ्यांना जमा करण्यामागे त्याचा हात असल्याचं समोर आलं आहे. 

'हिंदुस्थानी भाऊ'नं आजच्या आंदोलनासाठी चिथावणीखोर वक्तव्य आणि आवाहन केल्याचे व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही आढळून आले आहेत. यानंतर मुंबई पोलिसांनीही याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसंच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. 

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात खुद्द 'हिंदुस्थानी भाऊ'ची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. "मी कुठल्याही पक्षाशी किंवा संघटनेशी संबंधित नसून मी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर आलो. सरकारनं जर विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती", असं म्हणत शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा आपणच दिला होता याचीही कबुली दिली आहे. 

नेमकं काय म्हणाला हिंदुस्थानी भाऊ?
"मुलं आज त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर आली आहेत. मी कुठल्याही पक्षाशी किंवा संघटनेशी जोडलेलो नाही. मी फक्त विद्यार्थ्यांसाठी उभा आहे. गेल्या ३ महिन्यांपासून विद्यार्थी तणावात आहेत. याबाबतचे मेसेज मला मिळाले. दोन दिवसांपूर्वी आंदोलनासाठीचं आवाहन करणारा व्हिडिओ मी टाकला होता. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कारण सरकारनं त्याचं म्हणणं ऐकलं नाहही. त्याचं म्हणणं सरकारनं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. मी स्वत: उतरुन त्यांचा फक्त आवाज बनलो आहे. माझ्या मुलांनी कुणालाही त्रास दिलेला नाही", असं विकास पाठक ऊर्फ 'हिंदुस्थानी भाऊ' म्हणाला. 

Web Title: hindustani bhau first reaction on student agitation in dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.