Join us  

हिणकस... आयआयटी विद्यार्थ्याला बनविले ‘लैंगिक गुलाम’, गुवाहटीच्या तंत्रविद्येचाही वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 6:19 AM

उच्च शिक्षिताचे नीच कृत्य, पवईतील प्रकार

मनीषा म्हात्रेमुंबई : एका समलैंगिक ॲपच्या माध्यमातून पवईतील आयआयटीच्या विद्यार्थ्याशी ओळख करून त्याच्यावर अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक अत्याचार करत त्याला ‘लैंगिक गुलाम’ बनविण्याचा अत्यंत हिणकस आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे आयआयटीच्या विद्यार्थ्यावर अत्याचार करणारे उच्च शिक्षित दाम्पत्य आहे. त्यांच्यावर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कायदा, माहिती व तंत्रज्ञान, जादूटोणा कायद्यासह, अनैसर्गिक अत्याचार, हत्येचा प्रयत्न याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. 

पवईतील क्रिस्टल टॉवरमध्ये शुभ्रो  बॅनर्जी आणि मनश्री हे उच्च शिक्षित दाम्पत्य राहते. शुभ्रोची आयआयटीतील एका ३३ वर्षीय विद्यार्थ्याशी समलैंगिक ॲपवरून ओळख झाली. ओळखीनंतर शुभ्रोने या विद्यार्थ्याला मारहाण करत त्याच्यावर अमानुषपणे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने गुवाहाटीमधील एका देवीचा प्रसाद विद्यार्थ्याला खायला देत अंगारा लाऊन जप, तप, मंत्र आणि टॅरट कार्डचा वापर करून संमोहित केले. विद्यार्थ्याच्या हातात, गळ्यात दोरे बांधून  अंगावर मेणबत्तीचे चटके देत शुभ्रो त्याच्याशी तांत्रिक सेक्स करत असे. या विद्यार्थ्याला त्याने लैंगिक गुलाम (सेक्स स्लेव्ह) केले होते. विद्यार्थ्यावर वसतिगृहातील खोलीत आणि घरी शुभ्रोने हे अत्याचार केले.

 शुभ्रो हा जप, तप, मंत्र वगैरे म्हणत हातावर कापूर जाळून संबंधित विद्यार्थ्याला तांत्रिक सेक्स करायला भाग पाडायचा.  तांत्रिक सेक्स आणि टॅरट कार्डचा वापर करून संमोहनद्वारे तो तरुणाला बेशुद्ध करायचा तसेच अंगावर मेणबत्तीचे गरम थेंब टाकायचा.  हातावर, गळ्यात धागेदोरे बांधायचा. त्याने विद्यार्थ्याचे पासपोर्ट तसेच सगळी कागदपत्रे ताब्यात घेतली होती.

 शुभ्रोने दुधामध्ये गुंगीचे औषध मिसळून विद्यार्थ्याच्या काही कागदपत्रांवर सह्या करून तीन फॉर्म भरून घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

 बॅनर्जी दाम्पत्याविरोधात गेल्या वर्षी २५ ऑक्टोबर रोजी पवई पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस अधिक तपास करत आहेत. सोशल मीडियावरही शुभ्रो विद्यार्थ्याची बदनामी करायचा.

पत्नीने दिली धमकीबॅनर्जीची पत्नी मनश्री हिचीही पतीच्या कृत्यात साथ होती. मनश्रीने तरुणाविरोधात पोलिस ठाण्यात खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

टॅग्स :मुंबईआयआयटी मुंबईविद्यार्थी