Join us  

वाचन संस्कृती जपणारे हिरवे गुरुजी; मित्रमंडळींना मोफत पुस्तके देण्याचा छंद

By मनोहर कुंभेजकर | Published: September 02, 2022 4:19 PM

दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत ते ज्या ज्या गणेशभक्तांना भेटतात त्यांना गोष्टींची पुस्तके व वाचनीय मॅगझीन आठवण भेट म्हणून आवर्जून देतात व त्यांचा हा मोफत पुस्तके देण्याचा उपक्रम मागील २०-२२ वर्षपासून सुरू आहे

मुंबई- सध्या सोशल मीडियाचा जमान्यात वाचनाचा सराव कमी होत असून प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचणाऱ्यांची संख्या रोडावत चालली आहे अशावेळी पुन्हा एकदा पुस्तक आपली छान सोबत करू शकतात व वाचन व लेखन हे छान छंद असून त्याने आपली भाषा सुधारते व याच भावनेतून जोगेश्वरी पूर्व  येथील सामाजिक कार्यकर्ते,आदर्श पुरस्कार विजेते शिक्षक गणेश हिरवे सरांनी मोफत पुस्तक देण्याच्या छंद जोपासला आहे.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत ते ज्या ज्या गणेशभक्तांना भेटतात त्यांना गोष्टींची पुस्तके व वाचनीय मॅगझीन आठवण भेट म्हणून आवर्जून देतात व त्यांचा हा मोफत पुस्तके देण्याचा उपक्रम मागील २०-२२ वर्षपासून सुरू आहे. केवळ गणेशोत्सवच नाही तर एरव्ही ते सण-उत्सवाच्या निमित्ताने ज्यांना ज्यांना भेटतात व त्यांच्या घरी येणाऱ्या मित्र मंडळी व पाहुण्यांना देखील ते भेटी दाखल एखाद वाचनीय पुस्तक भेट देतात.आतापर्यंत त्यांनी अनेक शाळा, ग्रंथालये, क्रीडा स्पर्धा, सण-समारंभ-उत्सव आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जवळपास बारा हाजरांहून अधिक पुस्तकं भेट दिली आहेत.

सरांच्या बॅगेत नेहमीच चार-पाच पुस्तक आपल्याला नेहमीच सापडतीलच.पुस्तक भेट देण हा मनाला समाधान देणारा उद्योग आहे असं ते मानतात.पुस्तके आपल्या जीवनात दीपगृहाचे काम करतात व ग्रंथांसारखा दुसरा मित्र नाही व याच उद्देशाने हिरवे सर मागील अनेक वर्षांपासून विनामूल्य पुस्तक वितरीत करीत असून त्यांच्या या छंदाचे नागरिकांसह सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

टॅग्स :मुंबईगणेशोत्सव