Join us

मृत्यूपूर्वीच ब्रॅन्डनने काढले होते स्वत:च्याच हत्येचे रेखाचित्र

By admin | Published: December 28, 2016 3:44 AM

आरेमध्ये धडापासून शीर वेगळे केलेल्या अवस्थेत ब्रॅन्डन गोन्सालवीस (२२) याचा मृतदेह सापडला होता. हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पण तपास अधिकाऱ्यांना

- गौरी टेंबकर,  मुंबईआरेमध्ये धडापासून शीर वेगळे केलेल्या अवस्थेत ब्रॅन्डन गोन्सालवीस (२२) याचा मृतदेह सापडला होता. हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पण तपास अधिकाऱ्यांना ब्रॅन्डनने स्वत:च्याच हत्येचे काढलेले रेखाचित्र त्याच्या घरी सापडले आहे. त्यामुळे पोलीस तपासाला वेगळी दिशा मिळणार आहे.ब्रॅन्डनचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी धार्मिक विधीसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू सापडल्या होत्या. त्यामुळे त्याची हत्या नरबळीचा प्रकार आहे का, या अनुषंगानेही पोलीस तपास करीत आहेत. त्याला चित्रकलेची आवड होती, असे त्याची आई सीमा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ब्रॅन्डनच्या घरी घेतलेल्या झडतीत पोलिसांना त्याचे एक निळ्या रंगाचे मोठे ‘ड्रॉर्इंग बुक’ सापडले आहे. ज्यात त्याने दोन रेखाचित्रे काढली आहेत. या दोन्ही चित्रांत पूजाविधी, जंगल परिसर, हसणारा नारळ तसेच कोट घातलेली एक व्यक्ती हातात कुऱ्हाड घेऊन उभी असून विचित्रपणे हसताना दिसत आहे. या चित्रात त्यांच्या समोरच बळी देण्यासाठी एक तरुण बसलेला दिसत आहे. मुख्य म्हणजे या तरुणासमोर कुऱ्हाड उगारलेली असतानादेखील हा तरुण हसताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर कुठेही भीती दिसत नाही. त्यामुळे या चित्राने तपास अधिकाऱ्यांना कोड्यात टाकले आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन ‘बाबां’नाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.मृतदेह आणि रेखाचित्रातही साम्य आढळलेआरेच्या युनिट क्रमांक २मध्ये ब्रान्डनचा मृतदेह २० डिसेंबर रोजी सापडला होता. मुख्य म्हणजे ब्रान्डनने रेखाटलेले रेखाचित्र आणि त्याचा मृतदेह ज्या स्थितीत सापडला त्यात साम्य आहे. त्यामुळे ब्रॅन्डनला त्याच्या सोबत असे काही होणार आहे, याची कुणकुण लागली होती का, असा सवाल तपास अधिकाऱ्यांना पडला आहे.अशा प्रकारचे चित्र काढण्यामागे ब्रॅन्डनचा उद्देश काय असावा, याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.३५ लोकांचे जबाब नोंदवले : ब्रॅन्डनच्या हत्येची चौकशी परिमंडळ १२चे विशेष पथक तसेच क्राइम ब्रांच युनिट १२ करत आहे. नरबळीसह वैमनस्य, आर्थिक व्यवहार, प्रेमप्रकरण तसेच त्याला असलेले अमलीपदार्थांचे व्यसन या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी अद्याप त्याचे मित्र, नातेवाईक अशा ३५ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. यात १० संशयितांचा समावेश आहे.