'दिल्लीत त्यांचा पक्ष फुटला, ते त्यांनी सांभाळावं'; केसीआर यांच्या दौऱ्यावर CM शिंदेंचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 02:51 PM2023-06-27T14:51:01+5:302023-06-27T15:01:59+5:30
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांशी संवाद साधताना केसीआरच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत प्रश्न विचारला.
मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. तर मंत्र्यांसह, आमदार खासदारांना मात्र बाहेरुनच नामेदव पायरीचे दर्शन घ्यावं लागलं. पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळं मोजक्याच कोअर कमिटीच्या लोकांनी के चंद्रशेखर राव यांच्यासोबत मंदिरात सोडण्यात आलं होतं.
महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे. त्यासाठी ते दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरु झालेल्या केसीआर यांच्या या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालं आहे. तब्बल ६०० गाड्यांच्या ताफ्यासह के. चंद्रशेखर राव सोलापूरात दाखल झाले. के. चंद्रशेखर राव यांच्या या दौऱ्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. केसीआर यांचा पक्ष भाजपाची बी टीम आहे. राज्याची जनता सुज्ञ आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांशी संवाद साधताना केसीआरच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत प्रश्न विचारला. यावर केसीआर यांनी स्वत:चा पक्ष सांभाळावा. दिल्लीत त्यांचा पक्ष फुटला, ते त्यांनी सांभाळावं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. त्यांचं राज्य सांभाळावं. त्यांच्या राज्यातल्या लोकांना सुविधा द्याव्यात. महाराष्ट्रात आम्ही समर्थ आहोत. महाराष्ट्र सरकारने गेल्या ११ महिन्यांत जनतेला सोयीसुविधा दिल्या. त्यामुळे आम्हाला त्यांची चिंता नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच आता त्यांना भाजपाची बी टीम म्हणणाऱ्या लोकांनी आधी त्यांना घरी बोलावून स्वागत करत होते, जेवायला दिलं आणि आता बी टीम म्हणताय, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
मुंबई येथे पत्रकारांशी संवाद.. (२७.६.२०२३) https://t.co/kr8eHEXttm
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2023
दरम्यान, महाराष्ट्रात येऊन हे शक्तिप्रदर्शन तुम्ही कोणाला दाखवत आहात?, तुमचा पक्ष तेलंगणात. तुम्ही महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन करत असताना दिल्लीत तुमचा पक्ष फुटला आहे. अनेक माजी मंत्री, अनेक माजी खासदार आणि प्रमुख नेते यांनी काल काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. हा त्यांच्या पक्षाला सर्वात मोठा हादरा आहे. त्यांचे प्रमुख लोक काँग्रेसमध्ये गेल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. तेलंगणातला हा जो पक्ष महाराष्ट्रात ६०० गाड्या ७०० गाड्या आणून हे पैशाचं, संपत्तीचं, सत्तेचा ओंघळवान दर्शन आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात, अशी टीकाही संजय राऊतांनी केली. तसेच केसीआर यांचा पक्ष भाजपाची बी टीम आहे. राज्याची जनता सुज्ञ आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला.