Join us  

इतिहासात रमला ‘हिस्टेरिया’ महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2016 3:22 AM

इतिहासासारख्या रटाळ वाटणाऱ्या विषयाला मनोरंजनात्मक पद्धतीने अभ्यासले तर तो विषय अधिक जवळचा वाटतो. याची प्रचिती रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाच्या ‘हिस्टेरिया’

- गुरुप्रसाद शिरोडकर,  मुंबईइतिहासासारख्या रटाळ वाटणाऱ्या विषयाला मनोरंजनात्मक पद्धतीने अभ्यासले तर तो विषय अधिक जवळचा वाटतो. याची प्रचिती रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाच्या ‘हिस्टेरिया’ महोत्सवात आली. महोत्सवादरम्यान साक्षात जिजाबाई भोसले, मुमताज, हिटलर, चाचा नेहरू, अनारकली, मस्तानी अवतरल्या आणि इतिहासाची पाने पुन्हा एकदा उलगडण्यात आली.घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुवाला महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे ‘हिस्टेरिया’ या इतिहास महोत्सवाचे १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. ‘मनोरंजनातून इतिहास’ शिकविण्यासाठी या वेळी इतिहासावर आधारित अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. यात वेषभूषा स्पर्धा, अ‍ॅड मॅड, मॅड अबाऊट व्हॉट्स अ‍ॅप, ऐतिहासिक नाटक आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली. साऱ्या स्पर्धांना इतिहासाचा टच असल्यामुळे विद्यार्थीही इतिहासात बुडून गेले होते. अ‍ॅड- मॅड या जाहिरात स्पर्धेत ऐतिहासिक स्थळांवर विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस जाहिराती तयार केल्या. वेषभूषा स्पर्धेत इतिहासातील विविध व्यक्तिरेखा सादर करत इतिहासावर प्रकाशझोत टाकला. नाटकातून पेशवाई आणि संतपरंपरेलाही उजाळा देण्यात आला. ऐतिहासिक वारसा आणि देशाचा इतिहास विद्यार्थ्यांना महोत्सवाच्या माध्यमातून कळावा यासाठी या अनोख्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, असे प्राध्यापिका मेहेर मेस्त्री यांनी सांगितले. (प्रतिनिधी)निकालऐतिहासिक नाटक स्पर्धा- नथनेल रणदिवे आणि चमू (पेशवाई)ऐतिहासिक वेषभूषा स्पर्धा- शिखा इम्रानप्रश्नमंजुषा स्पर्धा- युगंधरा साळुंखे आणि बिंद्या पाटणकरअ‍ॅड-मॅड (ऐतिहासिक स्थळ जाहिरात स्पर्धा)- युतिका केळसकर, विभुती शिंदेमॅड अबाऊट व्हॉट्स अ‍ॅप- कोर्नाद परेराफूड मेनिया- बिंद्या पाटणकर