ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याकडे पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष

By admin | Published: September 13, 2014 10:35 PM2014-09-13T22:35:13+5:302014-09-13T22:35:13+5:30

ऐतिहासिक जंजिरा हे देशविदेशातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असून दरवर्षी लाखोंच्या संख्येने हौशी पर्यटक 35क् वर्षापूर्वी उभारलेल्या या जलदुर्गाला भेट देऊन इतिहासात रममाण होतात.

The historic Janjira fort overlooks the archaeological department | ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याकडे पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष

ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याकडे पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष

Next
मेघराज जाधव ल्ल मुरूड
ऐतिहासिक जंजिरा हे देशविदेशातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असून दरवर्षी लाखोंच्या संख्येने हौशी पर्यटक 35क् वर्षापूर्वी उभारलेल्या या जलदुर्गाला भेट देऊन इतिहासात रममाण होतात. जंजिरा हा वास्तुशिल्पाचा अजोड नमुना असून अनेक घनघोर सागरी लढाया अनुभवत, लाटांचा तुफानी मारा ङोलत हा दुर्ग आजही उभा आहे, मात्र पुरातत्त्व विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने या किल्ल्याची दुरवस्था ओढवू लागली आहे.
इंग्रजांसह डच, पोर्तुगीज आणि छत्रपती शिवरायांना हा किल्ला अखेर्पयत सर करता आला नाही. कडवी झुंज व्यर्थ ठरवत कायम सिद्दीचे मांडलिकत्व पत्करत पश्चिम किनारपट्टीवरील 5 जलदुर्गामध्ये जंजि:याचे इतिहासप्रेमी तथा अभ्यासकांना जास्त महत्त्व वाटते. किल्ल्याचा विस्तार चक्क 22 एकर जागेत असून शत्रूपक्षाला सहजी न दिसणारे प्रवेशद्वार, गोडय़ा पाण्याचे दोन महाकाय तलाव, शस्त्रगार, मुलुख मैदानी तोफा, राजमहल, संपोरोण किल्ल्याला दगडी तटबंदी, 22 अभेद्य बुरूज आणि चिरे, ङिाजले तरी चुनामिश्रित शिसे असा हा चहू बाजूंनी अभंग असलेला इतिहासाचा मूक साक्षीदार खुणावतो आहे. 
जंजिरा किल्ल्याचे जतन करण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे सुपुर्द करण्यात आली असली तरी या किल्ल्याकडे पुरातत्त्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. गेल्या 3क् वर्षात किल्ल्यातील जुजबी साफसफाईपलीकडे पुरातत्त्व खात्याने काहीही केलेले नाही. आजही पावसाळी रानटी झाडेझुडपे एवढी वाढलेली आहेत की, किल्ल्यात फिरणोही अवघड झालेले आहे. साप, विंचू यांचा मुक्त संचार या ठिकाणी असतो. किल्ल्यामध्ये दोन गोडय़ा पाण्याचे तलाव आहेत. त्यावर आलेली शेवाळे आणि प्लास्टिक कच:यामुळे पाण्याला दरुगधी येते. गेल्या तीन वर्षापासून किल्ल्यातील 95 टक्के साफसफाई पूर्ण झालेली नाही. रंगरंगोटी तर दूरच, परंतु साधी उगवलेली रानटी झुडपेही तोडली गेलेली नाहीत. पर्यटकांना आनंद वाटेल, त्यांचे मन रमेल यासाठी अन्य सुधारणांची व्यवस्था व्हायला हवी. 
 
राजपुरी गावातील सुमारे 15क् कुटुंबीयांची उपजीविका शिडाच्या होडय़ांवर होत असली तरी पर्यटक मोठय़ा संख्येने आकर्षित होण्यासाठी सुधारणा हवी. जेणोकरून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार वाढले, अशी अपेक्षा आहे.

 

Web Title: The historic Janjira fort overlooks the archaeological department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.