Join us

आमच्या आयुष्यातील ऐतिहासिक क्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:07 AM

या लसीकरण मोहिमेत मी पहिल्या दिवसापासून सहभागी असून कूपर हाॅस्पिटलमध्ये लसीकरणाचा मान येथे प्रथम मी व माझ्या पत्नीला मिळाला. ...

या लसीकरण मोहिमेत मी पहिल्या दिवसापासून सहभागी असून कूपर हाॅस्पिटलमध्ये लसीकरणाचा मान येथे प्रथम मी व माझ्या पत्नीला मिळाला. हा आमच्या आयुष्यातील ऐतिहासिक क्षण आहे. लस घेताना कोणी भीती बाळगण्याचे कारण नाही. सतत मास्क लावणे, हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन यापुढेही करणे गरजेचे आहे.

-डॉ. दीपक सावंत, माजी आरोग्यमंत्री

.........................

आज देशात कोविड-१९ लसीकरण मोहीम सुरू झाली असून आम्ही यात सहभागी झालो, याबद्दल अभिमान आहे.

-डॉ. पिनाकीन गुजर, अधिष्ठाता, कूपर हॉस्पिटल

.................................

लस घेताना खूप अभिमान वाटला की, आज पहिल्या पाचांंत माझा क्रमांक लागला. गेली १० महिने येथील तज्ज्ञ म्हणून मी सतत कार्यरत होते. कोरोनाग्रस्त काही रुग्ण उपचारादरम्यान जग सोडून गेले, याबद्दल खूप दुःख झाले. मात्र, आज लसीकरण सुरू झाल्याने खूप आनंद झाला आहे. कोरोनाच्या गेल्या १० महिन्यांच्या लढाईत कुटुंबाचे मोठे सहकार्य मिळाले.

डॉ. नयना दळवी, भूलतज्ज्ञ, कूपर हॉस्पिटल

.............................................

१० ते १५ दिवसांत येथे सुसज्ज लसीकरण केंद्र सुरू करण्यात सर्वांचा मोठा सहभाग मिळाला. या केंद्राला मुंबईतील अद्ययावत केंद्र करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहाेत. आज पहिल्या पाच जणांमध्ये मला लस घेता आली, याचा खूप आनंद झाला आहे.

- डॉ. प्रसाद पंडित, फार्माकाॅलॉजी विभागप्रमुख, कूपर रुग्णालय

..........................

मी लस घेण्याची सुुरुवातीपासून तयारी केली हाेती. त्यामुळे लस घेताना भीती वाटली नाही. डाेस घेतल्यानंतर इंजेक्शन घेतल्यासारखेच वाटले.

- डाॅ. निनाद गायकवाड,

विभागप्रमुख ईएनटी विभाग, कूपर हाॅस्पिटल

------