मुंबईतील आगीच्या घटनांचा इतिहास; मागील काही वर्षांतील मुंबईत लागलेल्या भीषण आगी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 09:40 AM2023-10-07T09:40:24+5:302023-10-07T09:40:43+5:30

कांदिवलीच्या दामूनगर झोपडपट्टीत २०१५ मध्ये लागलेल्या आगीत सात जण मरण पावले, तर २५ जण जखमी झाले होते.

History of fire incidents in Mumbai; The terrible fires that broke out in Mumbai in the last few years | मुंबईतील आगीच्या घटनांचा इतिहास; मागील काही वर्षांतील मुंबईत लागलेल्या भीषण आगी

मुंबईतील आगीच्या घटनांचा इतिहास; मागील काही वर्षांतील मुंबईत लागलेल्या भीषण आगी

googlenewsNext

■ कांदिवलीच्या दामूनगर झोपडपट्टीत २०१५ मध्ये लागलेल्या आगीत सात जण मरण पावले, तर २५ जण जखमी झाले होते. कांदिवली आणि मालाड येथील आगीनंतर वन जमिनीवरील झोपड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

■ डिसेंबर २०१७ मध्ये साकीनाका येथीक फरसाण दुकानाला आग लागून दुकानातील १२ कर्मचारी मृत्युमुखी पडले होते.

■ मरोळ ईएसआयसी रुग्णालयाला २०१८ मध्ये लागलेल्या आगीत सहाजणांचा मृत्यू,
■ डिसेंबर २०१७ साली लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता, तर १२ जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजोस पबमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली होती. पबमध्ये पार्टी सुरु असताना आग लागली होती.

■ कुर्ला पश्चिम भागातील कोहिनूर रुग्णालयाजवळील एसआरए इमारतीला आग. ३९ जण रुग्णालयात.
■ नोव्हेंबर २०२२ मध्ये चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीटला लागलेल्या आगीत २५ दुकाने खाक.

या वर्षातील आगीच्या घटना

फेब्रुवारी-

मालाड पूर्वेकडील जामऋषी नगर येथील वन १४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता, तर १५ जण जखमी झाले होते. आगीत ५० पेक्षा जास्त झोपड्या जाळून खाक झाल्या होत्या. आगीत १५ सिलिंडरचा स्फोट झाला होता.

मार्च-
 ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत मार्केटची मोठी हानी.
साकीनाका येथील हार्डवेअर दुकानाला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू.
 कांजुरमार्ग येथील म्हाडा इमारतीला आग, एक जखमी.

सप्टेंबर-
जोगेश्वरी येथील हिरापन्ना मॉलला सप्टेंबर महिन्यात लागली आग.
सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू,
३ दादर हिंदू कॉलनीतील रेनट्री इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू.

Web Title: History of fire incidents in Mumbai; The terrible fires that broke out in Mumbai in the last few years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.