Join us  

अंधेरीत इतिहास घडणार, बहुमताने निवडून येणार; भाजपा उमेदवार मुरजी पटेलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 11:03 AM

भाजपा घाणेरडे राजकारण करत नाही. पुढेही करणार नाही. ऋतुजा लटकेंचा राजीनामा ही तांत्रिक बाब होती. त्याचा भाजपाशी संबंध नव्हता असं मुरजी पटेल म्हणाले.

मुंबई - विकासाचं राजकारण घेऊन आम्ही पुढे जात आहोत. अंधेरीतील युवांना रोजगार देऊ. सर्वात जास्त जीएसटी कर अंधेरीतून जातो. मतदारसंघाचा म्हणावा तेवढा विकास झाला नाही. रस्त्यांवर वाहतूक कोंडीने लोक त्रस्त आहे. अंधेरी जनता सूज्ञ असून विकासाला मतदान देणारी आहे. प्रत्येक घरात माझा संपर्क आहे. त्यामुळे अंधेरीत इतिहास घडणार हे नक्की असा विश्वास भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांनी व्यक्त केला आहे. 

मुरजी पटेल म्हणाले की, भाजपाचा उमेदवार म्हणून मी अर्ज भरणार आहे. अंधेरी हे आमचं कुटुंब आहे. बहुमताने जनता निवडून देईल याची खात्री आहे. मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. पक्ष जो आदेश देईल तो मी मान्य करतो. आमच्यासोबत खरी शिवसेना आहे. आरपीआय गटसोबत आहे. महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय. दुपारी १ वाजेपर्यंत आम्ही अर्ज भरणार आहे. मंत्री दीपक केसरकर, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, दिलीप लांडे, प्रकाश सुर्वे अनेक आमदार, खासदार अर्ज भरताना उपस्थित राहतील असं त्यांनी सांगितले. 

विरोधकांचे आव्हान वाटत नाहीभाजपा घाणेरडे राजकारण करत नाही. पुढेही करणार नाही. ऋतुजा लटकेंचा राजीनामा ही तांत्रिक बाब होती. त्याचा भाजपाशी संबंध नव्हता. भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय म्हणून मी प्रतिनिधित्व करणार आहे. विरोधकांचे आव्हान वाटत नाही. अपक्ष म्हणून मी ४८ हजार मते मी घेतली. आता तर भाजपासह युती पाठिंबा आहे. त्यामुळे ३० हजारांच्या मताधिक्याने निवडून येऊ. वेळोवेळी कोण मदत करतं हे अंधेरीतील जनतेला माहिती आहे. जनता विकासाला साथ देईल. गोरगरीब जनतेसाठी कोणी काम केले हे लोकांना माहिती आहे. अंधेरीच्या भविष्याची ही निवडणूक आहे. ६ तारखेला मुरजी पटेल आणि भाजपा काय आहे हे विरोधकांना कळेल असंही मुरजी पटेल यांनी म्हटलं. 

उद्धव ठाकरेंवर निशाणागद्दार कोण हे देशाला माहिती आहे. भाजपाच्या पाठित खंजीर खुपसून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार तुम्ही बनवले. जनतेने युतीला कौल दिला होता मात्र मुख्यमंत्रिपद काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करून मिळवले. त्यामुळे गद्दार कोण आहे हे लोकांना माहिती आहे असं सांगत भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भाजपाशिवसेना