होर्डिंग बळींची संख्या १४ वर; होर्डिंगच्या धोरणावरून राजकारण पेटले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 07:37 AM2024-05-15T07:37:04+5:302024-05-15T07:37:51+5:30

महापालिका 'अॅक्शन मोड' मध्ये

hoarding death toll rises to 14 and policy of hoarding ignited politics | होर्डिंग बळींची संख्या १४ वर; होर्डिंगच्या धोरणावरून राजकारण पेटले

होर्डिंग बळींची संख्या १४ वर; होर्डिंगच्या धोरणावरून राजकारण पेटले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घाटकोपरच्या रेल्वे पोलिस विभागाच्या जागेत नियम धाब्यावर बसवून उभारलेले बेकायदा अजस्त्र होर्डिंग कोसळल्याने सोमवारी झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ झाली आहे. सोमवारच्या या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात मंगळवारी आणखी सहा जणांची भर पडली. जखमींची संख्या ८० वर गेली आहे. या सर्वांमध्ये वयाच्या तिशीत आणि चाळीशीत असलेल्यांची संख्या मोठी आहे.

या दुर्दैवी घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले असून रेल्वे पोलिस विभागाने स्वतःहून महापालिकेला त्याच परिसरातील अन्य तीन होर्डिंग हटविण्याची विनंती केली. पालिकेने एमएमआरडी मदत घेत ते होर्डिंग काढून टाकली. याशिवाय महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईतील सर्व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याच्या सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ही मोहीम तत्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

मंगळवारी गगराणी यांनी घाटकोपर येथे घटनास्थळाला भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. घाटकोपर दुर्घटनेतील ४२ नागरिकांवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यापैकी ३६ रुग्णांना राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केले आहेत.

या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या घटनेवरून रेल्वे पोलिस, राज्य सरकार आणि महापालिकेला लक्ष्य केले. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीका करत या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.

उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य लोकसभेच्या उमेदवार वर्षा गायकवाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राजावाडी रुग्णालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली तर सांयकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

मृतांची नावे

- भरत राठोड (२५)
- चंद्रकमानी प्रजापती (४५)
- दिनेशकुमार जैस्वार (४४)
- मोहम्मद अक्रम (४८)
- बशीर अहेमद अली
- हनीफ शेख (६०)
- दिलीप पासवान (६१)
- पूर्णेश जाधव (५०)
- सतीश सिंग (५१)
- फहीम खान (२०)
- सूरज चौहान (१९)
- धनेश चौहान (४८)
- हंसनाथ गुप्ता (६८)
- सचिन यादव (२३)
- राजकुमार दास (२०)
 

Web Title: hoarding death toll rises to 14 and policy of hoarding ignited politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.