मुंबई: राज्यात ठिकठिकाणी होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या होलीकोत्सवात सहभाग घेतला.
एकनाथ शिंदे यांनी होळीचे पूजन केले. तसेच यावेळी जळणाऱ्या अग्नीसोबत राज्यातील दुष्ट विचार होळीत भस्मसात व्हावेत आणि सद्विचारांचा सहवास घडावा अशी प्रार्थना केली, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना होळीकोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, हिंदूं धर्मातील अत्यंत महत्वाचा आणि प्राचीन काळापासून साजरा केला जाणाऱ्या सणांपैकी एक सण म्हणजे होळी. हिंदू धर्मातील प्रत्येक सणांचे वैशिष्ट्य हे निसर्गाशी असलेल्या नात्यांची ग्वाही देणारे असते सूर्य जेव्हा उत्तरायण (उत्तर दिशेकडे प्रस्थान) केले जाते तो दिवस मकर संक्राती म्हणून साजरा केला जाते.
वसंत ऋतूचे स्वागत हे होळी सणाच्या माध्यमातून केले जाते. या सणाला एक नवीन सुरुवात म्हणून देखील पाहिले जाते. या सणात सर्व हिंदू बांधव एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत असतात. उत्सवाच्या पहिल्या दिवशी, प्रतीकात्मकपणे सर्व वाईट सवयी जाळून टाकण्यासाठी आणि रंगीबेरंगी आणि दोलायमान नवीन भविष्याचा मार्ग उघडण्यासाठी होलिका दहनाची प्रथा पार पाडली जाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"