लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार कायद्यांना विरोध करून कर्नाक बंदर येथे शुक्रवारी विविध कामगार संघटनांनी या दोन्ही कायद्यांची होळी केली.
कृषी आणि कामगार कायद्यांविरोधात छेडलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय कामगार संघटनांनी केले होते. त्यानुसार मुंबईतील विविध कामगार संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. महाराष्ट्र हिंद मजदूर सभेच्या वतीने कर्नाक बंदर येथे कृषी व कामगार कायद्यांची होळी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे कार्याध्यक्ष व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस विद्याधर राणे, युवा समितीचे खजिनदार रमेश कुऱ्हाडे, ट्रान्स्पोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सचिव राजाराम शिंदे, आयटकचे कॉ. उदय चौधरी यांच्यासह अनेक कामगार नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.