होळी रे होळी... टी-शर्टला ‘झळाळी’

By admin | Published: March 23, 2016 03:00 AM2016-03-23T03:00:42+5:302016-03-23T03:00:42+5:30

‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ असे म्हणत गोडधोड पदार्थ आणि रंगांची उधळण करून होळी आणि धुळवड साजरी करण्यात येते. प्रत्येक सण हा काही तरी ट्रेंड्स घेऊन येत

Holi rah Holi ... T-shirt 'bright' | होळी रे होळी... टी-शर्टला ‘झळाळी’

होळी रे होळी... टी-शर्टला ‘झळाळी’

Next

मितेश जोशी,  मुंबई
‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ असे म्हणत गोडधोड पदार्थ आणि रंगांची उधळण करून होळी आणि धुळवड साजरी करण्यात येते. प्रत्येक सण हा काही तरी ट्रेंड्स घेऊन येत
असतो. यंदा होळीच्या टी-शर्टनी तरुणाईला आकर्षित केले असून, या होळीनिमित्त टी-शर्टला ‘झळाळी’ मिळाली आहे.
आपण पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून धुळवड खेळणारी चित्रपटातील गाणी पाहिली असतील. पण पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करत धुळवड साजरा करण्याचा जमाना आता मागे पडला आहे. वेगवेगळ्या सणांसाठी काही तरी नवीन, फंकी आणि हटके कपडे तरुणाईला आवडत असल्याचे चित्र आहे. ही आवड लक्षात घेऊन यंदा शहर आणि उपनगरांतील बाजारपेठांमध्ये मराठी, हिंदीतील विविध डायलॉग असलेले टी-शर्ट पाहायला मिळत आहे.
‘होळी रे होळी पुरणाची पोळी’, ‘होली कब है, कब है होली ?’, ‘बुरा ना मानो होली है’ असे संवाद रंगीबेरंगी फॉन्टमध्ये रंगवलेले टी-शर्ट अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. लाल,
हिरवा, निळा, चॉकलेटी या गडद रंगांबरोबर पांढऱ्या टी-शर्टवर केलेल्या रंगकामांना कॉलेजियन्सकडून पसंती मिळत आहे. या टी-शर्टवर
आधीच वेगवेगळ्या रंगाचे ठसे असल्यामुळे तुम्ही धुळवड साजरी केली आहे की काय, असा भास त्याकडे पाहिल्यावर होतो. सध्या मुलुंड, विक्रोळी, दादर, कुर्ला, गिरगाव, मस्जिद येथील बाजारपेठांत हे टी-शर्ट उपलब्ध आहेत.

Web Title: Holi rah Holi ... T-shirt 'bright'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.